Skill India Digital App 2023 : सरकारचा नवा उपक्रम , मिळणार नोकरीच्या संधी

Skill India digital App हे प्रत्येक भारतीय युवा वर्गास गरज असलेल्याआधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण देईल. Skill India Digital APP ही एक डिजिटल सार्वजनिक सुविधा आहे , ही भारतातील तरुणांना कौशल्य, शिक्षण, विविध क्षेत्रामध्ये रोजगार आणि उद्योजकता यास प्राधान्य देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

सर्व सरकारी ” कौशल्य आणि उद्योजकता ” उपक्रमांची माहिती तसेच व्यक्तीगत प्रगती व नेहमीच नवीन गोष्टी शिकण्याच्या शोधात असलेल्या नागरिकांसाठी एक प्रकल्प असणार आहे.

Skill India digital App तयार करताना , प्रचंड लोकसंख्येमुळे निर्माण झालेल्या आवश्यक गोष्टींसाठी म्हणजेच नोकरीची संधी , उद्योगांसाठी लागणार्‍या-विशेष कौशल्य अभ्यासक्रम, आणि उद्योजकांना सर्व क्षेत्रात समर्थन देणे , या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला आहे.

यामध्ये अंतर्भूत असलेल्या विविध कौशल्य अभ्यासक्रमांचा समावेश हा तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये व उद्योगांमध्ये नोकरीची संधि उपलब्ध करून देवू शकतो. हे APP वापरण्यास खूप सोपे आहे व आपल्या देशातील बहुतांश भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्याचे उद्दिष्टच मुळात भारतातील सर्वांच्या कौशल्य, अपस्किलिंग आणि रिस्किलिंग गरजा पूर्ण करणे , हे आहे.

Skill India Digital App

डिजिटल पोर्टफोलिओ ( QR कोड ) : Skill India Digital APP 2023

स्किल इंडिया हा डिजिटल कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचा एक उपक्रम आहे आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने (NSDC ) विकसित केला आहे .स्किल इंडिया डिजिटलने वैयक्तिकृत QR कोडद्वारे डिजिटल CV / BIO DATA बनवण्यास सुरुवात केली आहे.

भविष्यात या App मध्ये खूप सुधारणा होऊ शकते. भविष्यात , तुमचा डिजिटल पोर्टफोलिओ तपासून , म्हणजेच , तुमच्या वैयक्तिकृत QR कोड स्कॅन करून, जो Skill India Digital App च्या मदतीने बनविला गेला आहे, त्याद्वारे, तुमच्याकडील असणारी , कौशल्ये, पात्रता, अनुभव आणि उपलब्धी याची माहिती कोणतीही कंपनी किंवा फर्म मिळवेल व तुमच्यासाठी नोकरीची संधी निर्माण होऊ शकेल.

या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ,सध्या , केंद्र आणि राज्य सरकार यांच्या बरोबरच विविध विभागांमार्फत सुरू असलेले सर्व प्रशिक्षण कार्यक्रम हे एकत्रितपणे वापरले जातील. सध्या सुरू असलेल्या सर्व सरकारी प्रशिक्षण कार्यक्रमांच समावेश हा स्किल इंडिया डिजिटल APP मध्ये एकत्रित करून, हा प्लॅटफॉर्म कौशल्य विकास उपक्रमांसाठी मध्यवर्ती केंद्र ( Centralised Hub ) म्हणून तयार करत आहेत.

यासह, विविध क्षेत्रांमध्ये कौशल्य वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी विविध सरकारी संस्था सक्रियपणे सहभागी आहेत.

Skill India Digital App

Image Source : Google

स्‍थानीय सेवा

हे डिजिटल APP वापरून तुम्ही स्थानिक पातळीवर सुद्धा ही सेवा वापरू शकता व नवीन skill शिकून स्वतःला update ठेवू शकता. ही सेवा तुम्हाला ,तुमच्या जवळील स्थानिक केंद्रांची माहिती देवू शकते. कौशल्य विद्यापीठे, ITIs, JSS, PMKVY, पॉलिटेक्निक, CSR केंद्र, शैक्षणिक संस्था, उद्योग-मालकीच्या संस्था आणि फी-आधारित केंद्र, अशी सर्व केंद्रे समाविष्ष्ठ केली गेली आहेत. याव्यतिरिक्त, वापरकर्ते विशिष्ट फिल्टर वापरून स्थानिक नोकरी आणि शिकाऊ संधी, प्रशिक्षक, ओडीओपी आणि विविध राज्ये आणि जिल्ह्यांतील आगामी बॅच चा तपशील देखील शोधू शकतात. सरकारी प्रशिक्षण कार्यक्रमांच्या एकत्रीकरणास प्रोत्साहन देणे.

Read More : – Skill India Digital APP

स्किल इंडिया डिजिटलची वैशिष्ट्ये

शोध आणि संधी

Skill India digital App हा प्लॅटफॉर्म युवा वर्गाच्या आवडीनुसार किंवा क्षमतेनुसार, संबंधित अभ्यासक्रम व योजना याची परिपूर्ण माहिती उपलब्धा करून त्यांना प्रशिक्षण आणि नोकरीच्या संधी शोधण्यास प्रेरित करते.

Skill India Digital App 2023

Image Source : Google

अभ्यासक्रम

यामध्ये सखोल शिक्षण आणि प्रशिक्षण, किमान कौशल्य विकास कार्यक्रम, ते वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित आवश्यक कौशल्ये असा अभ्यासक्रम कोणीही निवडू शकतात.

आधार/एआय-प्रमाणित फेशियल ऑथेंटिकेशन

योग्य व्यक्ति, सुरक्षा, आणि तपासणी

योजना

वापरकर्ते विविध मंत्रालयांकडून अवलंबिल्या जाणार्‍या ” कौशल्य आणि उद्योजकता ” योजना मधून अल्प-मुदतीच्या कौशल्य कार्यक्रमांपासून ते करिअरचा विकास आणि आजीवन शिक्षण या उद्देशाने दीर्घकालीन अभ्यासक्रम अवलंबू शकतात

शिकाऊ शिक्षण

वापरकर्ते विविध उद्योगांमध्ये शिकाऊ संधी शोधू शकतात. यामध्ये On The Job प्रशिक्षण हे सैद्धांतिक ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग कसं करावा , यासाठी फारच उपयोगी आहे

नोकऱ्या

वापरकर्ते विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी शोधू शकतात आणि क्षेत्र, वेतन श्रेणी आणि स्थानानुसार त्यांची प्राथमिकता निश्चित करू शकतात. हे डिजिटल App , असे एकीकृत व्यासपीठ आहे , ज्यामध्ये भारतीय युवा वर्ग त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, त्यांच्या पसंतीच्या आणि गरजांच्या आधारे , कोणताही कौशल्य अभ्यासक्रम किंवा योजना, कुठल्याही
कौशल्य केंन्द्रामध्ये पूर्ण करून , प्रशिक्षण आणि नोकरी करण्यासाठी सज्ज राहील

Read More : Seed Fund Scheme Startup साठी फक्त नावीन्यपूर्ण भन्नाट कल्पना ( Idea) किंवा धडाकेबाज योजनेसाठी, सरकार Business करण्यासाठी RS. 50 लाख देत आहे.

आंकड़ें

5,00,000+ नोंदणी
90,000+ ऐप डाउनलोड
13,000+ प्रमाणपत्र
450+ पाठ्यक्रम
7 भाषाएं

उद्देश काय आहे

युवा भारतीयांस आवश्यक असणार्‍या “ कौशल्य, शिक्षण, रोजगार आणि उद्योजकता ” याबद्दल व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून, त्यामध्ये नेहमीच समन्वय साधणे व काळाप्रमाणे परिवर्तन करणे हे स्किल इंडिया डिजिटलचे एकमेव उद्दिष्ट आहे. उद्योगाशी संबंधित कौशल्य अभ्यासक्रम, नोकरी आणि उद्योजकता अशा अनेक गोष्टींमध्ये नेहमी मदत करणारे, हे व्यासपीठ, लाखो भारतीय युवा मनांच्या अपेक्षा आणि स्वप्नपूर्तीचे प्रतीक आहे.

1 thought on “Skill India Digital App 2023 : सरकारचा नवा उपक्रम , मिळणार नोकरीच्या संधी”

Leave a Comment