Seed Fund Scheme भन्नाट आणि धडाकेबाज योजनांसाठी सरकार देणार RS. 50 लाख

Seed Fund Scheme Startup साठी फक्त नावीन्यपूर्ण भन्नाट कल्पना ( Idea) किंवा धडाकेबाज योजनेसाठी, सरकार Business करण्यासाठी RS. 50 लाख देत आहे.

Seed Fund Scheme

एखाद्या नवीन कल्पनेच्या आधारावर जर तुम्ही स्टार्टअप् चालू करत असाल तर ती संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी काही चाचण्या करणे गरजेचे असते, , त्यास ” प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट ” (Proof Of Concept) , असे म्हणतात.

या चाचणीसाठी गरज असते ती सीड फंडिंग (Seed Funding) / निधी ची , यासाठी सरकारने सुरू केलेल्या Startup India Seed Fund Scheme ची मदत भासते.

कोणत्याही स्टार्टअपच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये कराव्या लागणार्‍या खर्चासाठी निधी असणे खूप महत्वाचे आहे. कोणत्याही स्टार्ट अप ला सर्वप्रथम प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट (Proof Of Concept) तयार करावा लागतो तरच तुम्हाला तुमच्या योजनेमध्ये गुंतवणूकदार सहभागी होऊ शकतात, उदा. उद्यम भांडवल संस्था, त्याचप्रमाणे बँकाही केवळ मालमत्तेनुसारच (Asset) कर्ज देतात.

अशा स्थितीमध्ये, कोणत्याही स्टार्टअप्सला प्रूफ ऑफ कॉन्सेप्टच्या मिळवण्यासाठी सीड फंडिंग (Seed Funding) मिळणे गरजेचे असते. ते सरकारकडून Startup India Seed Fund Scheme या योजनेद्वारे पूर्ण केले जाऊ शकते.

Seed Fund Scheme
Seed Fund Scheme Image : Google

पंतप्रधान मोदींनी सुरू केली ही योजना

अशा परिस्थितीत, स्टार्टअपला मदत करण्यासाठी, पंतप्रधान मोदींनी 16 जानेवारी 2021 रोजी Startup India International Summitमध्ये या Seed Fund Scheme योजनेची घोषणा केली होती.

DPIIT कडून अंदाजे 945 कोटी रुपए, 300 इनक्यूबेटरच्या माध्यमातून, या 4 वर्षात, सुमारे 3600 उद्योजकांना त्यांच्या स्टार्टअप्सच्या मदतीसाठी दिली जाणार आहे, तसेच एक तज्ज्ञ सल्लागार समितीही मदतीसाठी स्थापन केली आहे.

या योजनेचा उद्देश काय आहे?

Startup India Seed Fund Scheme चा उद्देश स्टार्टअप्सना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे, जेणेकरून ते त्यांच्या संकल्पनेचा पुरावा Proof Of Concept तयार करू शकतील. यामुळे तुम्ही तुमचे Business Model जगासमोर प्रदर्शित करू शकता , जेणेकरून मार्केटमध्ये तुमची ओळख निर्माण होईल, तुमच्या उत्पादंनांची किवा कल्पनेची ग्राहकांमार्फत घेऊ शकता तसेच तुमच्या उत्पादंनांचे किंवा सेवांचे, महत्व आणि त्यांचे व्यावसायीकरण करणे , तुम्हाला सोपे जाऊ शकते

त्याच्या मदतीने, एखाद्या स्टार्टअपला अशा स्तरावर पोहोचण्यास मदत होते जिथे ते एंजल निवेशक (Angle Investor) किंवा वेंचर कैपिटल फर्म (Venture Capital Firm)म्हणजेच उद्यम भांडवल संस्थांकडून सहजपणे निधी मिळवू शकतात. तसेच कोणत्याही हरकतीं शिवाय बँकेकडून सुद्धा कर्ज मिळू शकते.

https://www.startupindia.gov.in यावर click करा

Seed Fund Scheme

Image Source : Google

सरकार से कैसे स्टार्टअप तक पहुंचता है पैसा?

सर्वप्रथम, सीड फंड की रकम , DPIIT द्वारे मंजूर केली जाते आणि ती तज्ञ सल्लागार समितीकडे पाठविली जाते. तिथून कमीत कमी २-३ वर्षांपासून ज्यांचे कामकाज व्यवस्थित सुरू आहे अशाच इन्क्यूबेटरकडे हा निधी जातो. नंतर DPIIT मान्यताप्राप्त स्टार्टअप्स, या इनक्यूबेटर कडून पैसे स्वीकारू शकतो.

स्टार्ट अप चालू करताना सगळ्यात हे महत्वाचे आहे की तुमच्याकडे असलेले उत्पादन किंवा असलेल्या सेवा मध्ये सुधार करणेसाठी , एखादी कल्पना असणे गरजेचे आहे की जी बाजारपेठेत चालेल, आपण तिचे व्यापारीकरण करू शकू आणि यामध्ये व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर घेवून जाण्याची क्षमता असेल.

एखाद्या स्टार्टअपसाठी हे महत्त्वाचे आहे की ते त्याचे उत्पादन किंवा सेवा किंवा व्यवसाय मॉडेल किंवा वितरण मॉडेल किंवा पद्धतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून समस्या सोडवत आहे . सामाजिक प्रभाव, कचरा व्यवस्थापन, पाणी संबंधीत समस्या, व्यवस्थापन, आर्थिक गुंतवणूक, शैक्षणिक प्रगति, शेती, अन्न प्रक्रिया, जैवतंत्रज्ञान, आरोग्य, ऊर्जा, गतिशीलता, सुरक्षा, अवकाश, रेल्वे, तेल आणि वायू, वस्त्रोद्योग यासारख्या क्षेत्रात प्रभाव टाकणारा किंवा सद्यस्थितीत चालू असणार्‍या व सेवांना विकसित करू शकणार्‍या स्टार्टअप चा विचार केला जाईल.

कोणत्याही शासकीय योजने मार्फत स्टार्टअपला 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आर्थिक मदत मिळाली नसेल तर, तसेच , कोणत्याही, स्पर्धा आणि भव्य आव्हानाना जिंकून मिळवलेल्या आर्थिक मदतीचा सहभाग या स्टार्टअपमध्ये करता येणार नाही

त्याशिवाय सगळ्यात महत्वाचे, जागेचे अनुदान, संस्थापकाचा पगार किंवा भत्ता, प्रयोगशाळेला लागणारा खर्च किंवा कोणत्याही सुविधांचा खर्च मान्य केला जाणार नाही. भारतीय प्रवर्तकांचा सम भाग – हिस्सा नियमांनुसार किमान ५१ टक्के प्रत्येक स्टार्टअपमध्ये असावा.

योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, स्टार्टअपला अनुदान आणि कर्ज किंवा परिवर्तनीय डिबेंचरच्या स्वरूपात एक वेळसाठी सीड फंडिंग निधीचा पाठिंबा मिळू शकतो.

हे ही वाचा :- Skill India Mission 2023

Leave a Comment