Reliance JioGlass 2023 : AR / VR मोडसह 100 inch डिसप्ले

Reliance JioGlass 2023 : Reliance ने Jio Smart Glass चे ( AR / VR MODE ) उद्घाटन दिल्लीतील IMC 2023 टेक इव्हेंट, दिल्ली येथे केले. Reliance JioGlass 2023 हि तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन चक्क 100-इंच डिस्प्लेमध्ये बदलली जाऊ शकते. Jio स्मार्ट ग्लास या वर्षाच्या शेवटी आपण खरेदी करू शकतो. कंपनी दोन प्रकारचे product लॉन्च करेल – एक ग्राहकांसाठी आणि दुसरी एंटरप्राइजेससाठी.

Reliance JioGlass 2023: काय आहेत वैशिष्ट्ये?

रिलायन्सने स्मार्ट ग्लास प्रदर्शित केली आहे – JioGlass. Tesseract च्या वेबसाइटवर डिव्हाइस ‘लवकरच येत आहे’ म्हणून प्रसिद्ध केले आहे. Reliance JioGlass 2023 मध्ये आपल्या स्मार्टफोनची स्क्रीन जवळजवळ 100-इंच डिस्प्लेमध्ये परिवर्तीत झालेली तुम्ही पाहू शकता.

दिल्लीतील, IMC 2023 टेक इव्हेंटमध्ये, रिलायन्सनेआपल्या Jio स्मार्ट ग्लासचे प्रथमच अनावरणकेले . आपल्या ग्राहकांना मोहित करणार्‍या वेगवेगळ्या उत्पादंनांच्या जाहिरातींचा मारा विविध माध्यमांद्वारे करण्यात येत आहे. कंपनी फीचर फोन, लॅपटॉप, ब्रॉडबँड उपकरणे, gaming controllers, स्मार्टफोन आणि इतर बर्‍याच electronics उपकरणांबरोबरच ” JioGlass ” या नावाने प्रसिद्ध होत असलेल्या – स्मार्ट ग्लास च्या विक्री व वितरणासाठी जाहिरात करणे सुरू केले आहे. त्या Smartglass ची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे.

Reliance JioGlass 2023

Image Source : Google

संपूर्ण माहिती

कल्पना करा, की , तुम्ही एक चष्मा घातला आहे, ज्याचे वजन फक्त 75 ग्रॅम आहे. होय, हि ” JioGlass ” फक्त आपल्यासाठीच बनवलेली आहे. पण, त्याच्या SMART वैशिष्ट्यांसह. तुमच्या सेवेसाठी उपलब्ध होणार्‍या या विशिष्ट चष्म्यांमध्ये , नाजुक मेटॅलिक फ्रेम आणि दोन लेन्स आहेत. यासाठी पुरविण्या आलेली USB-C केबल जी तुम्ही Power Cable म्हणून सुद्धा या स्मार्टफोन साठी वापरू शकता. लवकरच, wireless connectivity support देण्याची ग्वाही कंपनीने दिली आहे. परंतु, सध्या जोडला गेलेला आपला स्मार्टफोन सुद्धा ” virtual controller for the JioGlass ” म्हणून वापरू शकता.

आता, येथे सर्वात उत्कंठावर्धक गोष्ट अशी आहे की , ही JioGlass तुम्ही चक्क व्हर्च्युअली 100-इंच पर्यन्त ,तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनला , तुमच्यासमोर हवेत तरंगत असल्यासारखी बदलू शकता आणि डोळ्यांना 1080p डिस्प्ले देणार्‍या JioGlass मध्ये असलेली फ्लॅप कधीही वेगळी करून , तुम्ही वारंवार ऑगमेंटेड रिअॅलिटी चा ( Augmented Reality) आनंद द्विगुणित करू शकता. तसेच, तुम्ही आभासी वास्तविकतेची (Virtual Reality) मौज सुद्धा, फ्लॅप ऑन केल्यावर घेवू शकता. यात volume किंवा virtual screen ची प्रकाशयोजना नियंत्रित करण्यासाठी, ट्रॅकपॅड कंट्रोलर सुद्धा आहे.

या व्यतिरिक्त, built-in Support सह, चांगल्या आवाजाच्या अनुभूती साठी दोन स्पीकर आहेत, ज्यामुळे तुम्हाला Theater मध्ये चित्रपट पाहिल्यासारखा आनंद घेता येईल. तुम्हाला voice calls साठी चांगल्या क्वालिटीचा microphone सुद्धा उपलब्ध आहे . यात हुड अंतर्गत 4,000mAh बॅटरी आहे, त्यामुळे वापरकर्त्यांना तीन तासांचा backup मिळेल , हे कंपनीने Reliance JioGlass 2023 बद्दल आश्वासन दिले आहे.

Reliance JioGlass 2023

JioGlass : किंमत आणि विक्री

कंपनीकडे दोन प्रकारचे product प्रदर्शित करण्यासाठी आहेत – एक ग्राहकांसाठी आणि दुसरी एंटरप्राइजेससाठी. अधिकृतपणे, नवीन JioGlass उपकरणाची किंमत तसेच ते मार्केटमध्ये कधी मिळू शकेल , याची माहिती रिलायन्सने अजून पुरविली नाही. पण असा प्रसार केला जात आहे की या वर्षअखेरीस Jio स्मार्ट ग्लास किंवा येत्या 2 / 3 महिन्यांत उपलब्ध होऊ शकतो.

Read More : – Leave Travel Concession 2023 – Central Government Employee – बाबत मोठी बातमी

JioGlass लवकरच उपलब्ध होऊ शकतो

कारण Tesseract च्या वेबसाइटवर JioGlass डिव्हाइस ‘लवकरच येत आहे’ म्हणून प्रसिद्ध केले गेले आहे, जे सध्या त्यांच्या प्लॅटफॉर्मवर सुरू असलेल्या ” अर्ली ऍक्सेस प्रोग्राम ” मध्ये जे interested आहेत, ते त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करु शकतात . परंतु, हे लक्षात ठेवा की, अर्ली ऍक्सेस प्रोग्रामसाठी, साइन अप करण्यासाठी तुम्हाला नाव, व्यवसाय ईमेल, संस्थेचे नाव आणि बरेच काही तपशील शेअर करणे आवश्यक आहे.

1 thought on “Reliance JioGlass 2023 : AR / VR मोडसह 100 inch डिसप्ले”

Leave a Comment