Papaya Nutritional Benefit

Papaya Nutritional Benefit – Papaya एक आरोग्यदायी फळ आहे, जे भारतात सर्वत्र सहज उपलब्ध होते. Papaya Nutritional Benefit म्हणजेच अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरचा भरपूर स्रोत असलेले हे एक रसाळ फळ आहे.

पपई खाण्याचे अनेक फायदे आहेत. पपई , ही शास्त्रीयदृष्ट्या कॅरिका फॅमिलीमधील Papaya म्हणून ओळखली जाते.

आपल्या शरीरास लागणार्‍या सर्व आरोग्यदायी घटकांचे ‘आगर ‘ असलेले चविष्ट फळ म्हणजे “पपई ” म्हणूनच तिला ” FRUIT OF ANGLES ” असेही म्हटले जाते . बिया आणि पाने सुद्धाऔषधी गुणांनी युक्त असणारी ही पपई , आपणा सर्वांनी आपल्या दैनंदिन आहारात तिचा समावेश करावयास हवा.

Papaya
Papaya image : Google

Papaya – का खावी पपई ?

डोळ्यांच्या संरक्षणासाठी

अतिशय नाजुक असलेले आपले डोळे हे अतिशय संवेदनशील असलेमुळे त्यांचे संरक्षण करणे हे सर्वस्वी VITAMIN A वर अवलंबून असते. त्यामुळे नियमित पपईचे सेवन हे डोळ्यांसाठी आरोग्यदायी ठरते. त्याचबरोबर त्वचेचा नाजुकपणा आणि केसांच्या वाढीसाठी सुद्धा पपई अतिशय उपयुक्त ठरू शकते.

रोगांना दूर करण्यासाठी

रोगांना दूर करण्यासाठी आपल्या शरीराची ताकद वाढवणे हे VITAMIN C मुळे शक्य होते इतरांपासून आपल्याला कोणत्याही रोगाची लागण होऊ नये , तसेच आपला रक्तप्रवाह नेहमी सुरळीत व्हावा म्हणून सुद्धा पपईचा उपयोग होतो.

रक्त गोठण्यास मदत करण्यासाठी

पपईमध्ये व्हिटॅमिन के असते जे रक्त गोठण्यास मदत करते तसेच जखमा लवकरात लवकर बर्‍या होण्यासाठी शरीरमध्ये व्हिटॅमिन के असणे गरजेचे असते. पपईमध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट प्रभाव असतो.आपल्या शरीरातील चयापचय क्रियेमुळे जे फ्री रॅडिकल्स निर्माण होतात त्याचा दुष्परिणाम कमी करण्याचे काम पपईमधील कॅरोटीनॉइड्ससह इतर अँटिऑक्सिडंट्स उत्तम प्रकारे करू शकतात.

हृदयरोगासाठी उत्तम उपाय

पपईमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखी खनिजे हृदयरोगाचा धोका दूर ठेवण्यास मदत करते. शरीरातील विषारी द्रव्ये ,कर्बोद्के व चरबीचे शोषण हे तंतुमय पदार्थ खाल्याने कमी होते जे पपईमुळे शक्य होते. पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि लायकोपीनचे प्रमाण हे हृदयाचे आरोग्य संतुलित ठेवण्यास मदत करते .

उच्च रक्तदाबाच्या नियंत्रणासाठी

पपईमध्ये पोटॅशियम असते जे उच्च रक्तदाबाच्या नियंत्रणासाठी मदत करते.काही संशोधनानुसार, पपईच्या पानांच्या अर्काचे सेवन रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करते आणि त्यात आहारातील फायबरअसल्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते.

मधुमेहाच्या नियंत्रणासाठी

पपईमध्ये फायबर असते जे मधुमेहाच्या नियंत्रणासाठी मदत करते. पानांच्या रसाचा आपल्या आहारमध्ये समावेश केला तर साखरेचे प्रमाण असलेले पदार्थ खाणे हे कमी होऊ शकते त्यामुळे मधुमेह पण नियंत्रित राहण्यास मदत होते.

पोटाच्या आरोग्यासाठी

तंतुमय पदार्थांमुळे चयापचय क्रिया सुधारते , शरीरातील अंतर्गत कार्यरत असलेल्या जीवाणूंची कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते व आपला कोठा साफ होण्यास मदत होते.

पपईतील पपेन एंझाइम प्रथिने पचण्यास सोपे बनवू शकते. पोटातील जळजळ कमी होते.

कर्करोगावर उपाय

पपईमुळे कोणत्याही प्रकारच्या कर्करोग होण्याचा संभव टळू शकतो . लायकोपीन प्रोस्टेट कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग यांसारख्या कर्करोगाच्या धोक्यापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतो.

वजन कमी करणे

पपई हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स, कमी कॅलरीज आणि फायबरचा भरपूर स्रोत असलेले एक रसाळ फळ आहे, ते वजन कमी करण्याच्या आहारांमध्ये समाविष्ट असते . तंतुमय पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या दोन आहारा मधील अंतर वाढले जाते आणि आपण खूप वेळ भुकेपासून दूर रहातो यामुळे आपसूकच वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

मेंदूचे कार्य

पपईमध्ये कोलीन असते जे सेल्युलर membranes ची रचना राखण्यास मदत करते, मज्जातंतूंच्या आवेगांच्या प्रसारास मदत करते, चरबी शोषण्यास मदत करते आणि तीव्र दाह कमी करते.

डेंग्यू ताप आणि प्लेटलेट्स

सध्या डेंग्यू तापावर इतर प्रमाणित वैद्यकीय सेवेबरोबर जर पपईच्या पानांचा अर्क रुग्णास दिला तर रक्तातील प्लेटलेट्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसून येईल आणि रुग्ण तापमुक्त होईल. हे शरीरावर पुरळ उठणे, रक्तस्त्राव इ. प्रतिबंधित करते. डेंग्यूच्या तापावर रामबाण उपाय म्हणून जर पपईच्या रसाचे सेवन केले तर तापाबरोबरच प्लेटलेट्सची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येईल .

मासिक पाळीच्या वेदना कमी करते

प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यात मासिक पाळीच्या वेदना होतात. या वेदना कमी करण्यासाठी पपईची पाना मध्ये आणि बिया यामध्ये असलेले एन्झाईम – पॅपेन हे खूप उपयोगी ठरते त्याचबरोबर पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज (पीसीओडी) ची लक्षणे दूर करण्यासाठी देखील हे उपयोगी ठरू शकते. हे प्रत्येक महिलांसाठी खास आहे .

Read More : Papaya

संभाव्य दुष्परिणाम

कच्ची किंवा हिरवी पपई मध्ये असलेल्या Latex मुळे गर्भवती महिलांवर वाईट परिणाम होऊ शकतो .
ज्यांची पचनक्रिया आधीच मंदावली असेल किंवा ज्यांना पचनाचा त्रास असेल त्यांनी पिकलेली पपई जास्त प्रमाणात खाऊ नये कारण अतिसाराचा त्रास होऊ शकतो तसेच त्यातील Chitin नावाचे एन्झाईम सुद्धा तुम्हाला Latex allergy निर्माण करू शकते .

पपई अन्ननलिकेला हानी पोहोचवू शकते. कच्च्या पपईच्या फळामध्ये असलेल्या Latex मधील Papain नावाच्या एन्झाइम मुळे, जर भरपूर प्रमाणात सेवन केले तर अन्ननलिकेच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.

आहारातील प्रमाण

शिजवलेली पपई अधिकच स्वादिष्ट लागते .
कोणत्याही फळाचा ज्यूस हा त्यातील पोषक तत्वांचा नाश न करता शरीरात अतिशय सहजपणे शोषली जातात. त्याच बरोबर कच्ची पपई सुद्धा तुम्हाला सशक्त बनवते.

पपई हे पोषक तत्वांचा एक उत्तम स्रोत आहे आणि दररोज एक वाटी खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. बियाही खा! ते बारीक करा आणि सीझन डिश मध्ये मिरपूड ऐवजी वापरा.

Papaya Nutritional Benefit – एक मध्यम आकाराची पपई 224% व्हिटॅमिन सी, 120kcal, 30g कार्बोहायड्रेट, 2g प्रथिने पुरवते.

Next Read : Experience Sustainable Travel 2024

निष्कर्ष

Papaya Nutritional Benefits असणारे म्हणजेच अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरचा भरपूर स्रोत असलेले तसेच पोषक तत्वांचे कोठार आणि देवदूतांचे फळ म्हणून ओळखले जाणारे एक कॅरिका प्रजातीतील एक रसाळ फळ आहे. ज्याचे नियमित सेवन केले असता आपल्याला डोळे , केस, त्वचा ,दाह, जळजळ , ब्लड प्रेशर , मधुमेह, पचन , कर्करोग, मासिक पाळी, डेंगू , मेंदू विकार, वजन कमी करणे, रक्त गोठणे, हृदयरोग , रोग प्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी , पोटाचे विकार कमी करण्यासाठी , अशा अनेक व्याधी पासून मुक्तता मिलनेसाठी फायदेशीर आहे . निरोगी राहण्यासाठी कुटुंबातील सर्वांनी मिळून रोज एका पपईचे सेवन करणे गरजेचे आहे , हेच खरे.

Leave a Comment