ONE NATION ONE ELECTION Advantages and Disadvantages

एक राष्ट्र एक निवडणूक

ONE NATION ONE ELECTION आपल्या देशातील निवडणुका या सुरुवातीपासूनच म्हणजे स्वातंत्र्यानंतर , एकदम वैशिष्ठ्यपूर्ण आणि लक्षवेधी ठरल्या आहेत. देशाच्या आकारमानामुळे आणि विविध भाषा, संस्कृती आणि श्रद्धा यांच्या सहअस्तित्वामुळे, भारतीय निवडणुका त्यांच्या विशालता, विविधता आणि जटिलतेने वैशिष्ट्यीकृत आहेत.

सरकारी आणि राजकीय वातावरण हे नेहमी एकमेकांसाठी पोषकअसेल तरच आपण सशक्त लोकशाहीचे स्वप्न पाहू शकतो. त्यामुळे ONE NATION ONE ELECTION चा विचार करणे आवश्यक आहे.

One Nation One Election
One Nation One Election Image : Google

ONE NATION ONE ELECTION लोकसंख्या आणि खर्च

लोकसंख्या विचारात घेता , काही करोड लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाचा नंबर हा पहिल्या तीन राष्ट्रामध्ये येईल. . वेगवेगळी बोलीभाषा, चालीरीती आणि अनेक राज्यामध्ये पसरलेल्या विशाल आणि महाकाय अशा आपल्या भारतामध्ये ONE NATION ONE ELECTION ही कल्पना राबवणे म्हणजे निवडणुकीच्या तयारीसाठी लागणारे मनुष्यबळ व पैसा याचा अपव्यय केल्यासारखे आहे

तसेच , अनेक राजकीय पक्ष , जातींना मिळालेले फायदे आणि मूलभूत सुविधांची वानवा यासारखे वेगवेगळे घटक निवडणुकासाठी यक्षप्रश्न निर्माण करत आहेत.

सामाजिक निष्पक्षता आणि समानता

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात, लोकशाहीचा प्रमुख घटक, निवडणुका हा आहे. निवडणुकांमुळे सर्वांना मिळालेला अधिकार, आणि देशाच्या या प्रक्रियेत सहभाग नोंदवण्याची ,तसेच अतिशय मोकळेपणाने , इतर सर्व नागरीकांसारखे ,आपल्याला असणार्‍या अधिकारांसह पूर्ण विचारपूर्वक संधीचा फायदा घेता येतो .

सर्व सज्ञान व्यक्तींना, जात, धर्म, लिंग किंवा त्यांच्या आर्थिक परिस्थिती अशा गोष्टींना विचारात न घेता, निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार आहे. हा अधिकारच सामाजीक निष्पक्षता व समानतेची भावना वाढवतो. हे हमी देते की राजकीय व्यवस्थेमध्ये विविध सामाजिक गटांना प्रतिनिधित्व देणे ही काळाची गरज आहे म्हणूनच ONE NATION ONE ELECTION ही संकल्पना सर्वांसाठी हितकर आहे.

एक राष्ट्र, एक निवडणूक (घोषणा)

एक राष्ट्र एक निवडणूक

खरे तर , भारतीय निवडणूक प्रक्रिया ही अनेक घटकांवर अवलंबून आहे. ONE NATION ONE ELECTION या गृहीतकाकडेही गेल्या काही वर्षांत लक्ष वेधले गेले आहे.

“एक राष्ट्र, एक निवडणूक” या वाक्याचा अर्थ एका राष्ट्रातील अनेक निवडणुकांच्या तारखांचे समन्वय साधण्याच्या कल्पनेला सूचित करतो जेणेकरून सर्व निवडणुका, मग ते राष्ट्रीय, राज्य किंवा नगरपालिका स्तरावरील, एकाच वेळी, साधारणपणेदर पाच वर्षा मध्ये एकदाच घेतल्या जातील,

या संकल्पनेने भारतासह अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या मुद्दयांवरून वितंडवाद झाले तसेच अनेक संभ्रम निर्माण झाले, परंतु या धोरणाच्या समर्थनात काही महत्वाचे , सक्षम आणि भक्कम मुद्द्यांचा विचार आपण केला पाहिजे .
फायदे:

कमी खर्च, बचत आणि स्थिर शासन

अप्रत्यक्ष होणारा लाभ

देशामध्ये या सर्व गोष्टींची अंमलबजावणी एकाच वेळी केली तर खर्चामध्ये अप्रत्यक्ष लाभ मिळू शकतो म्हणजेच अप्रत्यक्षपणे सेवा आणि साधंनावरील होणारा अपव्यय आपण टाळू शकतो ,

तसेच लोकांचीच जमा झालेली संपत्ती आपण भविष्यातील इतर अनेक गोष्टींसाठी वापरू शकतो व आपल्या सरकारला नवीन उपक्रमांसाठी उपाययोजना करण्यासाठी अधिक वेळ मिळू शकतो .

वाढलेले मतदान,धोरण स्थिरता आणि कार्यक्षमता

अधिक सहभाग

एकाच वेळी अधिकाधिक लोकांचा सहभाग जर प्राप्त झाला तर इतर सर्वांना सुद्धा याचे महत्व कळेलच .

कायमस्वरूपी अंमलबजावणी

भारत हा निवडणुकांचा देश आहे हा गैरसमज दूर होईल तसेच शासकीय नवनवीन योजना प्रत्यक्षात आणणे व सुधारणेला प्रोत्साहन देणार्‍या सर्व कल्पनांची घोडदौड कायमस्वरूपी सुरू राहील .

योग्यता

अशा प्रसंगी शासकीय सेवा सुविधा पुरविणारे आपले वेगवेगळे शासकीय अधिकारी अतिशय जबाबदारीने पार पडू शकतील.

आव्हाने, तार्किक समस्या आणि राज्य स्वायतत्ता

प्रचंड लोकसंख्या ,अतिदूर पसरलेला महाकाय देश , दळणवळणाची साधने, स्थानिक भाषा, चालीरीती, परंपरा व संस्कृती लक्षात घेता यामध्ये सुसूत्रता किंवा सुसंवाद साधणे हे एक आपल्यासमोर असलेले एक आव्हान आहे , म्हणूनच प्रचंड मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि धन याची आवश्यकता आपल्याला भासणार आहे.

असमानता

अनेक राज्यांमध्ये असलेली वेगवेगळ्या पक्षांची वैचारिक विषमता, असमानता आणि असलेली परिस्थिति मिळून आपण सर्वजण एकच आहोत किंवा बनलो आहोत. संक्रमित निवडणुकांमुळे राज्य स्वायत्तता धोक्यात येऊ शकते आणि जास्त प्रमाणात केंद्रीकृत सरकार होऊ शकते कारण प्रत्येक राज्याची स्वतःची वेगळी राजकीयगतिशीलता असते.

कालावधी वाढवणे

कालावधी वाढवून जरी आपण निवडणुकांचे योग्य आयोजन जारी केले तरी त्यास असंविधानिक ठरवले जाईल त्यासाठी आपणास आधी संविधानिक कक्षेत राहून नवीन नियम बनविण्याची गरज आहे.

संसाधन वाटप आणि स्थानिक प्रशासन


विविध राज्यांमधील समस्या, त्यांचे अग्रस्थानी असलेले प्रश्न आणि उपलब्ध सोयी यावर वाईट परिणाम फक्त या एकत्र निवडणूक घेणे या निर्णयाने होऊ शकते .
एकत्र निवडणूक घेतल्यास प्रत्येक राज्यातील , जिल्ह्यातील व तालुक्यातील शासकीय संस्थांना काम करणे , त्यांचे प्रश्न मार्गी लावणे सोपे राहणार नाही . प्रादेशिक समस्या आणि स्थानिक सरकार यांचा परस्पर संबंध यावर याचा परिणाम होऊ शकतो.

राजकीय विरोध, फायदे आणि तोटे

राजकीय विरोध : ONE NATION ONE ELECTION याला सर्वच राजकीय पक्ष पाठिंबा देतील असे वाटत नाही कारण अनेकांचा असा विश्वास आहे की ती ताकदवान पक्षांनी कमकुवत पक्षांवर फायदा मिळवण्यासाठी वापरलेली युक्ती आहे.

भारतात एक राष्ट्र एक निवडणूक या संकल्पनेवर झालेल्या चर्चेवरून सुद्धा त्याच्या पारदर्शकतेवर किंवा गुणवत्तेवर कोणताही करार होऊ शकला नाही. एकूण , नवीन गोष्टींना सामोरे जाताना त्याचे हित आणि अहित लक्षपूर्वक अभ्यासणे, तसेच राजकीय पक्ष, राज्य सरकारे आणि व्यक्तींसारख्या इतर भागधारकांशी सल्लामसलत करणे समाविष्ट असेल.

घटनात्मक तसेच व्यावहारिक विचारांसह ही एक गुंतागुंतीची समस्या आहे, म्हणून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी काळजीपूर्वक नियोजन करावे लागेल.

Read More : – CHANDRAYAN – 3 चांद्रयान 3

Leave a Comment