National Pollution Control Day : तारीख, थीम , हृदयद्रावक इतिहास आणि महत्त्व 2023

National Pollution Control Day 2023 : भोपाळ वायू दुर्घटनेसारखी आपत्ती टाळण्यासाठी यावर्षी, National Pollution Control Day 2023, आपण शनिवारी 2 डिसेंबर या तारखेला साजरा करत आहोत. भोपाळ गॅस सारख्या घटनामधील सापडलेल्या दुर्दैवी लोकांच्या स्मरणार्थ हा दिवस आपल्या देशात ओळखला जातो. भारतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून प्रत्येक वर्षी 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

National Pollution Control Day

National Pollution Control Day Image : Google

National Pollution Control Day 2023 : थीम

“स्वच्छ आणि निरोगी ग्रहासाठी शाश्वत विकास” ही थीम राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस 2023 ची म्हणून ओळखली जाईल.

National Pollution Control Day 2023 साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजेच अनावश्‍यक औद्योगिक आपत्ती टाळण्यासाठी उद्योगांच्या न्याय्य वापराबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे.

मानवी निष्काळजीपणा आणि औद्योगिक उत्सर्जनामुळे होणारे पर्यावरणीय प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण कायद्यांचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, हा , राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस 2023, समर्पित आहे

वायू प्रदूषण, पाणी, माती, ध्वनी आणि इतर अनेक प्रकारच्या प्रदूषणांमुळे होणार्‍या पर्यावरणाच्या हानीकडे दुर्लक्ष होत आहे. आजच सावध होऊन आपल्या पृथ्वीचे आणि मनुष्य, प्राणिमात्रांचे अस्तित्व सुरक्षित करणे National Pollution Control Day 2023, ची गरज आहे.

National Pollution Control Day 2023 चा उद्देश हा हवा, जल, ध्वनी आणि माती प्रदूषणासह विविध प्रकारच्या प्रदूषणांबद्दल जनजागृती करणे आणि प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करणे हा आहे.

मानवी जीवन , वातावरण आणि आर्थिक परीस्थिती सारख्या घटकांना प्रदूषणामुळे धोका उत्पन्न झाला आहे. प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार, हृदयविकार, कर्करोग आणि इतर अनेक आजारांचा धोका त्याच बरोबर प्रदूषणामुळे नद्या, धरणे आणि इतर जलस्रोतांचे प्रदूषण होते, ज्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही.

विदारक इतिहास

भारतातील, राष्ट्रीय प्रदूषण दिनाचा भोपाळ वायू दुर्घटनेचा असा इतिहास आहे ज्यात हजारो लोकांचे प्राण गेले.

2 आणि 3 डिसेंबर 1984 च्या रात्री घडलेल्या या घटनेमुळे, प्रत्येक वर्षी 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस पाळला जातो. 2 डिसेंबर 1984 रोजी, अमेरिकन कंपनी युनियन कार्बाइड कॉर्पोरेशनच्या भारतीय विभागाच्या मालकीच्या कीटकनाशक प्लांटमधून जवळजवळ 45 टन घातक वायू मिथाइल आयसोसायनेट (MIC) बाहेर पसरले .नंतर काही क्षणातच विषारी वायूने हजारो लोकांन आपले प्राण गमवावे लागले आणि हजारो लोकांना शहरातून पलायन करावे लागले.

भोपाळ वैद्यकीय आवाहनानुसार, या घटनेत अंदाजे 15,000 ते 20,000 लोक मरण पावले आणि अर्धा दशलक्ष लोकांना श्वसन, मानसिक, दृश्य, श्रवण आणि इतर अपंगत्व आले. विशेष म्हणजे, सर्व जगामध्ये भोपाळ गॅस दुर्घटना ही आजपर्यंतची सर्वात वाईट औद्योगिक आपत्ती म्हणून ओळखली जाते.

या विदारक घटनेमुळे जनतेमध्ये प्रदूषणामुळे होणार्‍या संभाव्य दुष्परिणामाबद्दल जाणीव निर्माण झाली.

Read More : – राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन 2023

वरवर पाहता, कमी स्टाफ असलेल्या, या प्लांटमध्ये निकृष्ट संचालन आणि सुरक्षा पद्धतींमुळे हा अपघात झाला होता.

National Pollution Control Day 2023 साजरा करण्याचे महत्त्व म्हणजे भोपाळ वायू दुर्घटनेसारखी आपत्ती टाळणे आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानापासून पृथ्वीचे रक्षण करणे. वायू प्रदूषण कमी करण्याच्या मार्गांबद्दल आणि त्याचे दुर्बल करणारे दुष्परिणाम लोकांना माहिती देणे हे देखील त्याचे उद्दिष्ट आहे.

नको असलेल्या विषारी घटकांचा प्रसार किंवा नष्ट न होणार्‍या घटकांचा संचय म्हणजेच प्रदूषण, हे प्रामुख्याने आपल्या सृष्ठीतील पंचमहाभूतांचा नाश करण्याबरोबरच रोगराई पसरवण्याचे काम करत आहे .

पृथ्वी,जल अग्नि ,वायु व आकाश या पंचतत्वांचा समतोल प्रदुषणामुळे ढासळला आहे. जो आपल्याला श्वसन समस्या , छातीचे विकार, कर्करोग , अतिसार, कॉलरा, टायफाईड सारखे आजार , प्रचंड व सतत होणार्‍या आवाजामुळे सतावणार्‍या मानसिक ताण, चिंता, व नीट ऐकू न येणे अशा समस्या सुरू झाल्या आहेत.

शेत जमिनी खराब झालेमुळे पिकांवर व पर्यायाने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम झाला आहे.

उद्दिष्टे

National Pollution Control Day 2023 : हा दिवस वायु प्रदूषण नियंत्रित करणे या संदर्भात आपल्याला काय करता येईल, तसेच सर्वानुमते काही ठोस उपायांची अंमलबाजवणी काशी करता येईल : हे पाहू

  • औद्योगिक आपत्तींचे व्यवस्थापन आणि नियंत्रणका करावे याची जाणीव निर्माण करणे
  • औद्योगिक प्रक्रिया किंवा मानवी निष्काळजीपणामुळे होणारे संभाव्य दुष्परिणाम
  • उद्योगांमधून निघणाऱ्या धुरावर नियंत्रण ठेवणे
  • सर्व उद्योगांना आणी जनतेला प्रदूषण नियंत्रण कायदा समजावून सांगणे
  • शक्यतो सार्वजनिक वाहतूक वापरा. सीएनजी बस किंवा कार हा उत्तम पर्याय आहे, त्याशिवाय शक्य तिथे पायी जाणे , हे कधीही आरोग्यासाठीसुद्धा उत्तम आहे. वाहन जेवढे कमी वापरले जाईल, तेवढे प्रदूषण कमी होईल.
  • नियमित तपासणीसाठी तुम्ही तुमची कार गॅरेजमध्ये नेल्याची खात्री करा.

जुन्या वाहनांची नियमित तपासणी न केल्याने, जे वाहनाला जास्त पेट्रोल / डिझेल लागेल, ते तुलनेने नवीन वाहनांपेक्षा वायू प्रदूषण सारख्या समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावा आणि कचर्‍याचा पुनर्वापर करा. शेतीसाठी सेंद्रिय खते वापरा . इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा अतीवापर टाळा

जास्तीत जास्त झाडे लावा. आपल्या गावांमध्ये, शहरांमध्ये जर आपण अशी छोटी छोटी जंगले निर्माण केली तर झाडांमुळे मिळणारा ऑक्सिजन वायू प्रदूषण नियंत्रित करेलच, व आपले शहर ही सुंदर बनवेल. तसेच, झाडे तुमच्या पौष्टिक गरजा पूर्ण करतात आणि तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करतात प्रदूषण कमी करणे हे एक आव्हान आहे, परंतु आपण सर्वांनी मिळून काम केले तर आपण प्रदूषणमुक्त जग निर्माण करू शकतो.

सौर आणि पवन ऊर्जा

Green Electricity खरेदी करा आणि सौर ऊर्जा वापरा. पवन आणि सौरऊर्जा या प्रत्येक घरांमध्ये, छोट्या छोट्या उद्योगांसाठी वापरली गेली तर विजेची बचत तर होईलच व विजेचे बिल ही कमी येईल. Wind आणि Solar हे दोन्ही अखंड ऊर्जेचे स्त्रोत आहेत त्यामुळे प्रदूषणविरहित निर्माण होणार्‍या विजेचा आपण वापर करू शकतो

प्रदूषण नियंत्रण यासारख्या योजनामध्ये , जर शासन आणि उद्योगांबरोबर, जर जनतेचाही सहभाग असेल तर, ती योजना , सर्वांच्या योगदानामुळे निश्चितच यशस्वी होईल कारण आपल्या रोजच्या आयुष्यात एक पाऊल सर्वांनी जर बदलाच्या दिशेने उचलले तर प्रदूषण आटोक्यात आणणे , सहज शक्य होईल

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाचे महत्त्व : Importance of National Pollution Control Day

नॅशनल हेल्थ पोर्टल ऑफ इंडियाच्या मते, दरवर्षी जगभरात सुमारे 7 दशलक्ष लोक हवेच्या प्रदूषणामुळे मरतात. त्यात असेही म्हटले आहे की, प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या भयंकर परिस्थितीमुळे , जगामध्ये 90% लोकांना चांगली हवा मिळू शकत नाही. विशेष म्हणजे, हवेतील प्रदूषक शरीरात उपस्थित असलेल्या संरक्षणात्मक अडथळ्यांमधून जाऊ शकतात आणि
तुमच्या फुफ्फुसांना, मेंदूला आणि हृदयाला हानी पोहोचवू शकतात. उद्योगांमधून निघणारा धूर, आपल्या वाहनामुळे होणारे प्रदूषण तसेच कचरा , प्लॅस्टिक मुळे झालेले वायु प्रदूषण हे जगभरात वातावरणातील असलेला ओझोन थराच्या नाशास नुकसानकारक आहे.

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाचे मुळात तीन प्रमुख लक्ष्य आहेत. वाढत्या वायू प्रदूषणाबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि औद्योगिक आपत्तींचे नियंत्रण आणि व्यवस्थापन कसे करावे याबद्दल लोकांना शिक्षित करणे हा यामागचा उद्देश आहे.
आपल्या दुर्लक्षतेमुळे जे औद्योगिक प्रदूषण वाढलेले आहे ते नियंत्रीत करणेसाठी आपण सर्वजण एकत्रितपणे कायद्यांचे महत्त्व आणि प्रतिबंध करण्याबद्दल जनजागृती मोहीम राबवून हा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा करतो.

National Pollution Control Day 2023 : या हिरव्यागर सृष्टीस , अथांग पसरलेल्या सागरास व पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रास , प्रदूषणापासून मुक्त करा , नाहीतर एक दिवस तुम्ही या सर्व गोष्टींपासून मुक्त व्हाल .

Read More : Timed Out Dismissal 2023 : क्रिकेटमध्‍ये बाद होण्‍याचा सर्वात दुर्मिळ योग

Leave a Comment