Misuse Of Social Media

Misuse Of Social Media : Misuse Of Social Media म्हणजेच आपला सर्वांचाच वेळ सकाळपासून रात्रीपर्यंत किती वाया जातो हे आपणास तपासून पहावे लागेल . कारण इतरांशी संबंध ठेवणे, बोलणे व माहितींची देवाणघेवाण करणे हे पुर्वीसारखे राहिले नाही. समाजात वावरतांना वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा असलेल्या परस्पर संबंधावर आणि नात्यांवर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो . आजूबाजूला घटणार्‍या घटना आणि त्याची सोशल मीडियाने घेतलेली दाखल यामुळे सामाजिक विपर्यास घडतच असतात. सोशल मीडिया आता आपल्या शरीराचा एक नवीन अवयवच बनला आहे की काय असे वाटू लागले आहे , म्हणूनच Misuse Of Social Media हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे , हे मान्य करावेच लागेल.

Social Media Misuse

Image Source : Google

Misuse Of Social Media – गोपनीयतेला धोका

सोशल मीडिया वापरत असाल तर तुमचे नाव , गाव, तुमच्या प्रिय गोष्टी , म्हणजेच रोज तुम्ही नक्की काय काय पाहता याची नोंद घेवून , तुम्हाला हव्या असणार्‍या वस्तु, उत्पादने , प्रेक्षणीय स्थळे, व मनोरंजन अशा अनेक गोष्टींच्या जाहिराती तुम्हाला वारंवार तुम्हाला तुमच्या Screen वर दिसू लागतात.

तसेच आपल्याला सूचना देण्यासाठी म्हणजेच तुम्ही कुठे फिरायला जायचे, गाडी कुठली खरेदी करायची, कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा ,कोणत्या उपायांनी तुम्ही तुमचे आजार बरे करायचे यासाठी करतात म्हणजेच सोशल मीडिया जेव्हा या माहितीचा गैरवापर आपल्या परवानगी शिवाय करते तेव्हा आपण असे म्हणू शकतो की , त्यांच्याकडे असलेल्या या अफाट माहिती संग्रहाचा संभाव्यतः Misuse Of Social Media जसे की आपल्या गोपनीयतेला धोका निर्माण होऊ शकतो .

Social Media Misuse

Image Source : Google

सोशल मीडिया प्राप्त वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग

आपल्या वैयक्तिक माहितीचे उल्लंघन जसे की ईमेल पत्ते, फोन नंबर आणि अगदी पासवर्ड, आपल्या social Media profile मधून गैरमार्गाने उघड केले जाऊ शकते आणि दुर्भावनापूर्ण वापरले जाऊ शकते आणि आपल्यावर विचित्र परिस्थिती ओढवू शकते तसेच आपली मनस्थिती खराब होऊ शकते. अशा प्रकारे आपल्या वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग Misuse Of Social Media मुळेआपल्या सामाजिक प्रतिमेवर आघात करू शकते.

संमतीशिवाय माहिती प्रदान करणे

काही सोशल मीडिया किंवा सायबर क्रिमिनल हे आपले Profile आपल्या संमतीशिवाय इतर कंपन्यांना म्हणजेच विविध वस्तु उत्पादन करणारे व विक्री करणारे यांना विकू शकतात त्यामुळे त्या महितीचा गैरवापर झाला तर , अशा प्रकारे Misuse Of Social Media आपल्या अंगलट येवू शकतो.

Read More : – Misuse Social Media

आपल्या जाळ्यात ओढणे

फिशिंग ईमेल सारख्या तंत्राचा वापर करून अयोग्य , फसव्या, व आर्थिक फटका देणार्‍या मजकुरांमुळे / ईमेल मुळे म्हणजेच ” तुम्हाला काही कोटींची Lottery लागली आहे ” किंवा ” तुमचे बँक अकाऊंट आता बंद करण्यात येणार आहे ” असे सांगून आपली वैयक्तिक गोपनीय माहिती जसे की Bank ईमेल व Account Details वापरुन तुमचे Bank खाते रिकामे करू शकतात.

सोशल मीडिया वापरावर नजर ठेवणे

तुम्ही, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ज्यावेळी सक्रिय असता तेव्हा ते तुमचे ठिकाण व इतर माहिती एकत्र करून , ती माहिती इतरांना पुरवतात. तुमच्या सोशल मेडिया वापराचा वेळ , तुमचे ठिकाण व तुम्ही Screen वर नेहमी काय पहात असता या गोष्टींवरून तुमचे अस्तित्व सुद्धा धोक्यात येऊ शकते.

वापरकरत्याची माहिती

आपण आपल्या कुटुंबाचे व स्वतःचे, निरनिराळ्या प्रसंगी ,जे फोटो व Recording Moments आपल्या सोशल मीडिया वर Share करत होतात त्यावेळी ती सर्व माहिती खूप मोठ्या प्रमाणावर Viral होत असते . त्यावेळी सार्वजनिक झालेल्या post सायबर क्रिमिनल misuse करू शकतात. जसे की फोटोमोर्फिंग किंवा विडियो एडिटिंग .

अल्गोरिदम लक्ष्य ( Algorithm Targets )

आपण सोशल मीडिया वर आपल्या आवडीचे VDO, फोटो पाहत असतो , जसे की चित्रपट, गाण्याचे Album , स्पोर्ट्स, Web Series , राजकारण, , शॉपिंग , व इतर अनेक Websites , त्यामुळे या आपल्या सोशल मीडिया प्रवासाचे एक Profile बनले जाते त्यास संगणकीय भाषेत Algorithm असे म्हटले जाते. त्या द्वारे हे अल्गोरिदम तुम्हाला अधूनमधून उघड करू शकतात म्हणजेच तुमच्या वैयक्तिक सीमांचे उल्लंघन करणारी किंवा तुमच्या गोपनीयतेमध्ये घुसखोरी करणारी सामग्री. ठरू शकते.

डेटा अर्थात वैयक्तिक माहितीची विक्री

काही, सायबर क्रिमीनल्स काही विशीष्ठ कंपन्यांसाठी, जाहिरातींसाठी आपली वैयक्तिक माहिती पुरविण्याचे काम करतात आणि श्रीमंत होतात आणि यामुळे याचा परिणाम म्हणून अधिक समर्पक जाहिराती करता येणे हे शक्य होते तसेच हे देखील सूचित करते की तुमची खाजगी माहिती , तुमच्या माहितीशिवाय किंवा परवानगीशिवाय आर्थिक फायद्यासाठी उपयोगात आणली जात आहे .

वापरकर्त्यांचे वर्गीकरण

विशेष म्हणजे, सोशल मीडिया वरील व्यक्तींचे वय , लिंग, राहते ठिकाण, शहर , राज्य , त्याच्या / तिच्या आवडी, त्यांची एकूण संख्या , अशा अनेक घटकांचा वापर करून, त्या माहितीचे योग्य असे वर्गीकरण केले जाते, जी अवाजवी किंवा गैरवापर करू शकणारी असेल.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म – अत्याचार

सोशल मीडिया वर आपली खाजगी माहिती उघड करणे हे आपल्या चारित्र्यहनन किंवा मानसिक त्रास होणे याच बरोबर इतर अनेक धोके निर्माण होऊ शकतात म्हणून सोशल मीडिया नैतिकता आणि गोपनीयतेच्या गैरवापराचा धोका हा आपल्याला रोज भेडसावत राहणार.

Social Media Misuse

Image Source : Google

सुरक्षा प्रणाली अद्ययावत करा : Misuse Of Social Media

सुरक्षा प्रणालींचे नियम पाळा त्यान गरजेनुसार बादल करा ,कोणतीही POST Viral करत असताना सामाजिक जाणिवांचे भान ठेवा. online असला तरी अनोळखी लोकांपासून दूर रहा. सातत्याने सुरक्षेच्या नियम व अटी याबद्दल सजग रहा. वारंवार तुमचे पासवर्ड बदलणे आणि चालू करणे, द्वि-घटक प्रमाणीकरण करणे , या दोन्ही गोष्टी , तुमची सोशल मीडिया सुरक्षा सुधारू शकते.

Read More : – एक राष्ट्र एक निवडणूक

2 thoughts on “Misuse Of Social Media”

Leave a Comment