Leave Travel Concession 2023 – Central Government Employees – बाबत मोठी बातमी

हवाई तिकीट खरेदी करताना ही चूक झाल्यास पेमेंट होणार नाही

 Leave Travel Concession 2023 : Department of Personnel and Training ( DOPT ), Govt. of India ने जारी केलेल्या कार्यालयीन ज्ञापनानुसार, केंद्रीय कर्मचारी, तीन कंपन्यांमार्फत LTC तिकिटे बुक करतात व त्याचा स्क्रीन शॉटही क्लेम सेटल करताना त्यांना देणे आवश्यक होते. त्यामुळे या सर्व सोपस्कारा मध्ये कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते.

LTC ( Leave Travel Concession ) ची सुविधा मिळणार्‍या केंद्रातील कर्मचाऱ्यांकरता एक महत्त्वाची बातमी अशी आहे की जर त्यांनी LTC चा क्लेम करताना , त्यांच्याकडून छोटी जरी चूक झाली तर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल.

Leave Travel Concession 2023

Image Source : Google

Leave Travel Concession : बुकिंगची वेळ व स्लॉट

Leave Travel Concession ची सुविधा हवी असल्यास विमान तिकिटे खरेदी करताना कर्मचार्‍यांना बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेड, अशोका ट्रॅव्हल अँड टूर आणि इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडूनच घ्यावी लागतील.

DOPT ने या कंपन्यांकरता काही मार्गदर्शक तत्त्वे नमूद केली आहे. कंपन्या २४ तासांत किमान भाड्याने एक स्लॉट ठेवतील. या स्लॉटमध्ये कर्मचारी त्यांचे विमान तिकीट बुक करतील. आणि बूक केलेल्या तिकिटाचा स्क्रीन शॉट घेणे गरजेचे आहे. ते क्लेम फॉर्मसोबत जोडावे लागेल.

खरोखर , नियोजित आणि निर्धारित स्लॉटमध्ये बुकिंगची वेळ व स्लॉट , या दोन्हींचा समावेश तिकीटांवर असलेमुळे त्या तिकिटाचा स्क्रीन शॉट क्लेम करताना जोडण्याची गरज राहणार नाही. परंतु , निर्धारित आणि नियोजित स्लॉटच्या बाहेर जर तिकीट बुक केले किंवा करावे लागले तर क्लेम करताना संबधित कर्मचार्‍यास क्लेम करताना तो स्क्रीन शॉट सादर कागदपत्रांमध्ये जोडावा लागेल.

Leave Travel Concession 2023

Image Source : Google

कर्मचाऱ्यांकडून सतत अहवाल


डीओपीटीने जारी केलेल्या कार्यालयीन ज्ञापनानुसार, केंद्रीय कर्मचारीयांना डीओपीटी च्या अधिकृत जाहिरातींनुसार LTC ची विमान तिकिटे या तीन कंपन्यां कडूनच बुक कराव्या लागतात. Leave Travel Concession क्लेम घेताना त्यांना स्क्रीन शॉटही द्यावा लागेल. .सद्यस्थितीत , क्लेम करताना लागणार्‍या सर्व कागदपत्रांची जमवाजमव करताना केंद्रीय कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

डीओपीटी कडे येणार्‍या अहवालामध्ये स्पष्ट व पारदर्शतेची मागणी कर्मचार्‍यांकडून नियमित होत होती. DOPT नुसार सांगितल्या गेलेल्या सरकारी कंपनीकडून तिकिट खरेदी केली असल्यास त्याचा स्क्रीन शॉट देणे गरजेचे आहे का नाही , याची कल्पना आपल्याला मिळावी , अशी त्यांची आग्रही भूमिका होती.

बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेड ( M/s Balmer Lawrie & Company Limited (BLCL) ), अशोक ट्रॅव्हल अँड टूर ( M/s Ashok Travels & Tours (ATT) ) आणि इंडियन रेल्वे म्हणजेच – IRCTC – या तिन्ही कंपन्यांच्या वेबसाइटवर सर्वात कमी दर असलेल्या हवाई तिकीटांच्या माहितीचा समावेश DOPT च्या निर्देशा नुसार करावाच लागेल . जर सर्वात कमी किमतीचे तिकीट देवू शकत नसतील तर कमीत कमी दराच्या १० टक्के जास्त भाडे असलेल्या तिकिटांची यादी या कंपन्या दाखवू शकतात.

नियोजित आणि निर्धारित स्लॉटमध्ये जर तिकीट बूक केले असेल तर क्लेम करताना स्क्रीन शॉट जोडावा लागणार नाही , किंवा त्याची गरज नाही.
यापूर्वी , Leave Travel Concession तिकिटाचा क्लेम दाखल करताना कर्मचारी बुकिंगचा स्क्रीन शॉट इतर कागद्पत्रांबरोबर जोडत असत. फाईलमध्ये तिकीट बुकींगचा स्क्रिन शॉट नसेल तर संबंधित कर्मचाऱ्याला बिल मंजूर होण्यात अडथळे व विलंब होणे हे ठरलेलेच होते. स्क्रीन शॉटअभावी Claim रखडले होते .

कमीत कमी रकमेच्या तिकीटांचे बुकिंग हे कोणत्या स्लॉटमधून जास्त खरेदी केले गेले आहे हे संबंधित विभागास – Screen Shot च्या माध्यमातून कळणे सोपे जाते. या तिन्ही कंपन्यांना प्रत्येक दिवसाच्या २४ तासांत सगळ्यात कमी रकमेच्या तिकीटांच्या जास्तीत जास्त जागा उपलब्ध असतील असा टाईम स्लॉट देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर ते नसेल तर कंपनी त्या स्लॉटपेक्षा १० टक्के जास्त भाडे असलेली यादी दाखवू शकते. जेव्हा एखादा कर्मचारी निश्चित आणि नियोजित स्लॉटमध्ये तिकीट बुक करतो तेव्हा त्याला स्क्रीन शॉट जोडावा लागणार नाही. तिकिटावर ‘ स्लॉट आणि वेळ ‘ लिहिलेली असेल. याशिवाय तिकिटावर ‘ LTC TRAVEL ‘ ही लिहिलेले असेल.

Read More : Skill India Digital App 2023 : सरकारचा नवा उपक्रम , मिळणार नोकरीच्या संधी

पुढील स्लॉटची प्रिंट घ्यावी लागेल

ईशान्य, जम्मू काश्मीर, अंदमान निकोबार आणि लडाखमध्ये विशेष वितरण योजनेंमार्फत गैर-हक्क असलेल्या कर्मचाऱ्यांना विमान प्रवासाची सुविधा मिळू शकते. त्यासाठी घोषित मुख्यालयातून विमानाचे तिकीट मिळण्याची सुविधा संबंधित कर्मचारी घेऊ शकतो. परंतु LTC क्लेम करताना त्यांना त्या तिकीटाची एक प्रत जोडावीच लागेल. तसेच , त्यांना निश्चित किंवा निर्धारित स्लॉटमध्ये तिकीट उपलब्ध होत नसेल तर ते पुढील स्लॉटमध्ये तिकीट खरेदी करू शकतात.

एलटीसी क्लेम घेताना त्याची प्रिंट काढावी लागेल.एलटीसी तिकीट नोंदणीसाठी, ज्या कर्मचाऱ्यांकडे अधिकृत ईमेल नाही, ते खाजगी ईमेल आणि मोबाईल नंबर देऊन स्वतःची नोंदणी करू शकतात .त्यानंतरच त्यांचे तिकीट बुक केले जाईल. LTC चा गैरफायदा घेणार्‍यांसाठी, सर्व नियमांची कडक अंमलबजावणी करून , सर्व मंत्रालये आणि संबंधित विभाग हे नेहमीच कटिबद्ध राहतील , याची ग्वाही DOPT ने दिली आहे. कर्मचार्‍यांनी दाखल केलेल्या क्लेम फॉर्मवरील सर्व माहिती पुनःपुन्हा तपासली पाहिजे.

Leave Travel Concession कर्मचार्‍यास त्याच्या नोकरीचे पहिले वर्ष पूर्ण झाल्यानंतर, येणार्‍या 8 वर्षांत , चार वर्षांच्या प्रत्येक कालावधीमध्ये , 3 होम टाउन LTC आणि 1 ऑल इंडिया LTC यासाठी परवानगी मिळू शकते.

Leave a Comment