Ghee : 10 Health Benefits

10 Health Benefits Of Ghee : तुमच्या आरोग्याचे संवर्धन करण्यासाठी आणि तुमच्या जेवणाचा आनंद वाढवण्यास आपण 10 Health benefits Of Ghee काय आहेत आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम कसा होऊ शकतो, हे पाहू.

भारतीय पाककृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे तूप हे केवळ स्वादिष्टच नाही तर पौष्टिक देखील आहे.तुमच्या स्वयंपाकात फक्त चव वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्याच्या फायद्यासाठीही Ghee वापरा .

Ghee
Ghee Image : Google

Ghee : “Liquid Gold” आणि आपला आहार

# तापाशी लढण्यासाठी तूप आणि लसूण

सततचा येणारा ताप कमी करण्याचा जुना उपाय म्हणजे लसूण तुपात मिसळणे, हा एक नैसर्गिक उपचार म्हणून फार पूर्वीपासून केला जातो पण या उपायामुळे जर ताप कमी आला नाही तर डॉक्टरांना भेटणे हाच एक पर्याय आहे.

# तुपाचे सर्वोत्तम फायदे

तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढणेसाठी Ghee आणी साखरेबरोबरच पालेभाज्या खाणे हे अतिशय उपयुक्त आहे . शरीरास लागणार्‍या प्रोटीनयूक्त घटकांचे संवर्धन सुद्धा तुपामुळेच होते.

तसेच free Radicals पासून होणार्‍या पेशींच्या हांनीपासून रक्षण करणेसाठी व इतर रोगांचा संसर्ग टाळणेसाठी तुपातील असणारे अँटिऑक्सिडंट्स हे मदत करतात.

# नाश्ता आणि तूप

तुमच्या नाश्त्यात लोणी किंवा तेलाऐवजी तूप वापरा. ते टोस्टवर पसरवा किंवा परांठा किंवा पोह्यात मिसळा. त्यामुळे पदार्थ अतिशय स्वादिष्ट होतीलच व त्याचबरोबर शरीरास लागणार्‍या उर्जेसाठी वापरण्यात येणार्‍या Fats सुद्धा पुरविते.

# Lactose-Intolerant साठी सुद्धा तूप वापरा

ज्यांना लैक्टोजचा त्रास होतो त्यांनी तुपाचा समावेश आपल्या आहारा मध्ये करावा . दुध आणि प्रक्रिया केलेल्या दुग्धजन्य पदार्थांमुळे जर आपल्या आरोग्यास अपाय होत असेल तर त्यापासून मुक्त होणेसाठी Ghee हा एक चवदार पदार्थ आपल्या शरीरास स्वस्थता प्रदान करू शकतो.

# स्वयंपाक करताना तेलाच्या ऐवजी तुप वापरा

कोणतेही पदार्थ तूपामध्ये तळले तर ते अधिकच आरोग्यदायी व रुचकर ठरतात . तेल जर जास्त तापवले तर आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते पण जास्त तापवले तरी तूप हे नेहमीच चांगले राहते , उष्णतेचा कोणताही परिणाम तुपावर होत नाही, हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

त्वचा अधिक तजेलदार व नाजुक दिसणे तसेच केसांची वाढ व मजबूती यासाठी लागणारे Vitamins आणि अँटिऑक्सिडंट्स तुपामध्ये योग्य मात्रेमध्ये उपलब्ध असतात

# चांगले पचन होण्यासाठी दूध आणि तूप

पाचन समस्या दूर करण्यासाठी, दुधात तूप मिसळा. हे मिश्रण आराम देते आणि पचन सुलभ करते, पोटातील अस्वस्थतेसाठी हा एक साधा उपाय आहे .

पौष्टिक असणारे तूप हे इतर अनेक चविष्ट पदार्थ बनविण्यासाठी वापरले जाते ज्याने तुमची पाक कृती उत्तम पदार्थांमध्ये गणली जाऊ शकते. ते भाज्या , पालेभाज्या शिजवण्यासाठी, काही न्याहारीच्या पदार्थांवर वरुन तूप घालून त्याची चव वाढविण्यासाठी तसेच काही पदार्थांवर उदा. Bread किंवा टोस्ट यावर पसरवून त्यांची लज्जत वाढवण्यासाठी तूप नेहमी उपयोगात आणले जाते.

# निरोगी हृदयासाठी निरोगी चरबी

तुपामध्ये हेल्दी फॅट्स असतात जे हृदयासाठी चांगले असतात. तज्ञ डॉक्टर असे सांगतात की तूप आणि त्यामधील चरबी ही ही हृदयासाठी अतिशय उत्तम आहे व प्रत्येकाने व्यायामबरोबर तुपाचा आपल्या आहारमध्ये वापर करावा. तुप हे एक पारंपारिक भारतीय पदार्थ आहे जे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांपासून बनवले जाते.जे शरीरास लागणार्‍या सर्व पौष्टिक घटकांचा तसेच चांगल्या fats असणारा उत्तम पदार्थ आहे.

# उत्तम पाचक आरोग्यासाठी तूप

पूर्वीचे लोक आपल्या दैनंदिन आहारात तुपाचा वापर अवश्य करत असत कारण पचंनासाठी उत्तम तसेच उष्णतेपासून पोटात होणारे त्रास व त्याचबरोबर अल्सर किंवा कॅन्सर पासून आपला बचाव करण्यास तूप अतिशय उपयुक्त आहे, हे ते जाणत असत. पचन क्रिया सुधारणेसाठी तसेच अपचनामुळे होणार्‍या पोटामधील इतर रोगांना दूर करू शकणारे तुपातील काही Fatty Acids मदत करतात त्याचबरोबर आपल्या शरीरस फायदेशीर असणार्‍या जीवणूंच्या वाढीसाठी उपयुक्त असतात.

# कमजोरी कमी करणे साठी तूप

नवीन पेशींच्या निर्मितीसाठी उपयुक्त असणारे तसेच शरीरातील कमजोरी कमी करणेसाठी तुपामध्ये असणारे ब्युटीरिक ऍसिड हे नेहमी इतर आजारांबरोबर दोन हात करण्यास नेहमी सज्ज असते. शेवटपर्यंत हृदय मजबूत राहणेसाठी व नेहमी रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी स्थिर रहाणेसाठी लागणार्‍या ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी ऍसिड्स व त्याचबरोबर पूर्ण शरीरास एक वेगळी ऊर्जा देण्याचे काम , फक्त तूप जर आपल्या आहारमध्ये असेल, तरच चांगल्या पद्धतीने होऊ शकते.

# जीवनसत्वे

त्याच्या आनंददायी चवीशिवाय, तूप ए आणि ई जीवनसत्वाने समृद्ध आहे, जे तुमच्या यकृत, हार्मोन्स आणि प्रजननक्षमतेसाठी फायदेशीर आहे. एकूण आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी जेवणामध्ये तूप वापरणे हे हितकारक आहे . तुपातील कोलेस्टरॉल हे मेंदूच्या पेशींना सुरक्षित व मजबूत ठेवते तसेच तुपात असणारे कोलिन हे संप्रेषणासाठी मेंदूला मदत करते त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की Ghee हे नुसते चवदार पदार्थ नसून एक” औषध ” आहे

Read More : Minorities Rights Day 2023

2 thoughts on “Ghee : 10 Health Benefits”

Leave a Comment