Experience Sustainable Travel 2024

Experience Sustainable Travel 2024 : आज, आपण अशा युगात आहोत जिथे प्रवास पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाला आहे, त्यामुळेच Experience Sustainable Travel ही संकल्पना, प्रामुख्याने आपल्या भटकंतीचा, पर्यावरणीय प्रभाव, प्रकर्षाने समोर आला आहे. अतिप्रवासामुळे वातावरणातील वायु प्रदूषण ते जागोजागी वापरुन फेकलेल्या अनेक प्रकारच्या वस्तु जसे की PLASTIC, सर्वदूर आज आपणास पाहावयास मिळत आहे. तरीदेखील लोकांमध्ये पर्यावरण विषयक जागरूकता देखील वेगवेगळ्या प्रकारे वाढत आहे . त्यामुळे भविष्य आपण या समस्येवर मात करू शकू .

Experience Sustainable Travel ही संकल्पना लवकरच सर्वत्र रुजू शकेल .

Experience Sustainable Travel
Experience Sustainable Travel Image : Google

Experience Sustainable Travel : परिणाम

आपण या संकल्पनेप्रमाणे प्रवास करताना आपल्या रोजच्या जीवनशैली नुसार वातावरणात होणारे दूरगामी परिणाम जाणून घेण्याची नवीन दृष्टी आपणास नक्कीच प्राप्त होईल. उदाहरणार्थ, जसे की, हरितगृह वायू उत्सर्जनात विमान प्रवास सुद्धा कारणीभूत असू शकतो. पर्यटन स्थळांमध्ये प्लास्टिकच्या वाढीमुळे महासागर प्रदूषित होत आहेत आणि वन्यजीवांना हानी पोहोचत आहे.. जास्तीत जास्त साधन सुविधांचा वापर करताना , त्याचा पर्यावरणावरील प्रभाव समजून घेणे हीच प्रवासाची पहिली पायरी आहे.

Green Transportation

प्रवास करताना प्रदूषण कमी करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय निवडणे. इतर महागड्या सुविधांचा वापर करण्याऐवजी रेल्वे हा सगळ्यात best पर्याय आहे जेणेकरून काही तासात आपण गंत्यवस्थानी पोहोचू शकतो. स्थानी कमी अंतरासाठी विमान प्रवास करण्याऐवजी ट्रेन चा विचार करा. सार्वजनिक वाहतूक वापरा किंवा
vehicle Sharing चा पर्याय निवडा. सध्या विजेवर म्हणजेच Battery वर चालणारी वाहने ही प्रवासासाठी योग्य आहेत.त्यांचा वापर करा.

शहरांमधुन फिरताना सायकल, Three व्हीलर , car pooling चा वापर करा.ज्या विमान कंपन्या पर्यावरणाचा वापर इतर इंधंना बरोबरच क्लायमेट चेंज सारख्या कल्पनांचा विचार करूनच विमान सेवा पुरवितात अशाच Airlines च विचार आपण केला पाहिजे.

इको-फ्रेंडली निवासस्थान

तुम्ही, तुमच्या राहण्याची व्यवस्था कशा पद्धतीने करता याने देखील खूप मोठा फरक पडू शकतो . Wind Energy, Solar Energy वापरणे तसेच पाण्यावर प्रक्रिया करून तेच पाणी पुन्हा पुन्हा वापरणे, ते ही अगदी योग्य आणि आवश्यक प्रमाणात शिवाय टाकाऊतुन टिकाऊ वस्तु जिथे वापरल्या जातात अशा echo friendly ठिकाणी रहा .

इको-लॉज, वसतिगृहे आणि Green Certified हॉटेल्स, उदाहरणार्थ, LEED, Green Key, आणि Green Globe, यासारखी प्रमाणपत्रे मिळवलेल्या हॉटेल्स चा वापर करा.

कमी साहित्य

योग्य आणि प्रमाणात म्हणजेच कमी वजनाचे साहित्य हे नेहमीच आपल्यासाठी आणि आपल्या वाहनासाठी उपयुक्त ठरते. कचरा वाढू नये म्हणून वजनाने हलक्या असलेल्या वस्तु बरोबर घ्या आणि पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिक बॅग आणि टॉयलेटरी कंटेनर यासारख्या पुन्हा वापरता येण्याजोग्या वस्तू आणा.

जाणीवपूर्वक व्यवहार

नवीन ठिकाणे अभ्यासत असताना, आपल्या वस्तु खरेदी करण्याच्या पद्धती लक्षात घ्या. प्राण्यांच्या लोकरीपासून , कातडीपासून , शिंगांपासून किंवा वन्य जीवांचा व्यापार करून बनविल्या गेलेल्या वस्तू खरेदी वर कायमस्वरूपी निर्बंध घाला.
प्रामुख्याने तेथील चालीरितींचा , त्यांच्या भावनांचा मान ठेवून , त्यांनी बनविलेल्या वस्तु थेट त्यांच्याकडून खरेदी केल्या तर आपल्याला सुद्धा एक वेगळे समाधान लाभते.

प्लास्टिक

कुठेही प्लास्टिक प्रदूषण वाढू न देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. USE and Throw प्रकारच्या प्लॅस्टिक वस्तु वापरणे बंदच करा व त्याला कायमस्वरूपी पर्याय शोधा प्लास्टिकच्या स्ट्रॉ आणि पिशव्यांना नाही म्हणणे आणि आपल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे.

पर्यावरणपूरक कार्यक्रम किंवा प्रदूषण नियंत्रण दिवस कसा रोज साजरा करता येईल हेच Experience Sustainable Travel 2024 चे उद्दीष्ट असेल .

ठराविक स्थळे

मर्यादित स्थळांना भेटी दिल्यामुळे प्रवाशांना एकाच पर्यटन क्षेत्रात अधिक वेळ घालवण्यास प्रोत्साहित करतो, ज्यामुळे स्थानिक संस्कृती आणि वातावरणाशी अधिक सखोल संबंध येतो. यामुळे जास्त प्रवास न करता पर्यटन स्थळाबरोबरच प्रवासाचा आनंद ही लुटता येतो.

Support Sustainable Tourism Initiatives

बर्‍याच पर्यटन क्षेत्रांनी Sustainable Tourism उपक्रम स्वीकारले आहेत ज्यामुळे पर्यावरण आणि स्थानिक समुदाय दोघांनाही फायदा होतो.

अशा सहलींचे ,प्रवासाचे आयोजन करा जिथे पर्यावरण-प्रमाणित कार्यक्रमांना आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नांना प्राधान्याने समर्थन दिले जाते , जबाबदारीने वन्यजीव सफर घडवणे किंवा सामुदायिक विकास प्रकल्प राबवले जातात .

Carbon Emissions

आपले कार्बन फूटप्रिंट कमी कसे करावे हे जरी आपले लक्ष्य असले तरी कार्बन उत्सर्जन हा पण एक संशोधनाचा विषय आहे . पुनर्वसन किंवा नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्प यासारख्या हरितगृह वायूंचे ( GHG )समतुल्य प्रमाण कमी करणाऱ्या किंवा त्या साठवून ठेवणार्‍या योजनांमध्ये सहभागी होऊन आपले कार्बन उत्सर्जन कमीत कमी कसे होईल व त्याचा प्रवाशांमध्ये Experience Sustainable Travel द्वारे कसा प्रसार होईल हे नेहमीच विचारात घेतले पाहिजे.

स्वतःला आणि इतरांना शिक्षित करा

Experience Sustainable Travel 2024 ही सतत शिकण्याची प्रक्रिया आहे. नेहमी इतर प्रवाशांना प्रदूषण कमी कसे करावे याबद्दल त्यांच्याशी चर्चा करा व त्यांच्या कल्पना जाणून घ्या . आपल्या मित्रपरिवारास सुद्धा जबाबदारीने जगपर्यटन करण्यास मार्गदर्शन करा व ही वसुंधरा सुंदर बनविण्यास प्रेरित करा.

निष्कर्ष

Experience Sustainable Travel 2024 मध्ये सृष्ठीतील रहस्यांचा शोध घेत असता तिचे सौन्दर्य अबाधित कसे राहील हे पाहणेच पर्यटकांसाठी अधिक मनोरंजक असेल . ज्या स्थळांना आपण भेट देणार आहोत तेथील पर्यावरणपूरक व्यवसायांना सदिच्छा देत व तेथील पर्यावरणाची हानी न करता हे काम येणार्‍या उद्यासाठी कसे सहाय्यकरी होईल याचा विचार फक्त आपणच करू शकतो. Sustainable Travel हा मानव आणि पृथ्वी यांच्यातील अधिक सुसंवादी नातेसंबंधाकडे पर्यटनाच्या माध्यमातून समतोल राखण्याचा महामार्ग म्हणून भविष्यामध्ये पहिले जाईल, यात कोणतीही शंका नाही.

Next Read : Travel Is An Art : Discovering Culture, Nature and Our Limits

Leave a Comment