CHANDRAYAN

CHANDRAYAN – 3 चाद्रयान 3 : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशश्वीपणे पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरलेला आहे. CHANDRAYAN – 3 चाद्रयान 3 या मोहिमेबद्दल आपल्या सर्व शास्त्रज्ञांचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. साल १६६२ ते साल 2023 पर्यंतचा भारताचा अंतराळ प्रवास आज कोठे येऊन पोहोचलेला आहे, हे आपण पाहत अनुभवतो आहोत .

या प्रसंगी, चंद्राच्या पृष्ठभागावरती यानाचा प्रथम स्पर्श झाला आणि ते स्थानापन्न झाले त्याजागेला शिवशक्ती पॉईंट हे नाव आपल्या आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांचेकडून दिले गेले .

या प्रकल्पाच्या यशामुळे भारताच्या अंतराळ संशोधनाचे नवे युग सुरू झाले आहे , जे नवीन क्रांतिकारी योजना प्रत्यक्षात आणू शकेल . या यशामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा ( ISRO )नावलौकिक तर वाढलाच पण युवा संशोधकांच्या भावनांना नवी पालवी फुटली आहे .

CHANDRAYAN – 3 चांद्रयान 3 च्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधनाचा पुढचा टप्पा काय असू शकेल , याचा हा उहापोह

Read More :- CHANDRAYAN – 3 चांद्रयान 3

तांत्रिक नैपुण्य

इतर अनेक देशांसाठी अप्राप्य असणारी ही CHANDRAYAN – 3 चाद्रयान 3 अंतराळ मोहिम अत्यंत चिकाटीने आणि पूर्ण क्षमतेने यशस्वी केल्याने इसरो चे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित केले गेले आहे . येणाऱ्या काळात इसरो मानव ही चंद्रावरती पाठवू शकतो इतका आत्मविश्वास सध्या इसरो संशोधकाना नक्कीच आलेला आहे.

CHANDRAYAN

CHANDRAYAN – 3 Image : Google

नवी क्षितिजे

CHANDRAYAN – 3 चाद्रयान 3 – या चंद्र मोहिमेनंतर आता इतर ही खगोलीय रहस्यांचा शोध घेणे , हे भविष्यासाठी महत्वाचे ठरेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर, इतर खगोलीय रहस्यांची माहिती घेणे , हे वैज्ञानिकदृष्ट्या एक आव्हान असेल. इसरो भविष्यातील मोहिमा चंद्राच्या भूगर्भशास्त्र आणि संसाधने शोधण्यासाठी असतील अशी अशा आहे.

CHANDRAYAN

CHANDRAYAN – 3 Image : Google

भारतीय मानवाचे चंद्रावर पाऊल

CHANDRAYAN – 3 चाद्रयान 3 च्या यशामुळे भारतीय व्यक्ती चंद्रावर पाऊल ठेवू शकतो इतकी अपेक्षा करायला हरकत नाही, कारण ISRO ला जटिल अंतराळ योजना पार पाडण्याचा खूपच जबरदस्त अनुभव आलेला आहे.

CHANDRAYAN – 3 चाद्रयान 3 : सर्व ग्रहांची माहिती

या यशस्वी मोहिमेनंतर , इसरो नक्कीच इतर सर्व ग्रहांसाठी अशा योजना आखेल आणि आपल्याला सर्व ग्रहांची खगोलीय माहिती मिळू शकेल , याची मला खात्री आहे.

CHANDRAYAN

CHANDRAYAN – 3 Image : Google

आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्था

CHANDRAYAN – 3 चाद्रयान 3 च्या यशामुळे जागतिक स्तरावर इस्रोच्या प्रतिमा प्रचंड सुधारलेली आहे, काही वर्षपूर्वी पाश्चिमात्य देशांनी इसरोला हिणवण्याची एकही संधी सोडलेली न्हवती, आज तेच देश इसरोची तोंड भरून स्तुती करीत आहेत, याचे श्रेय अर्थात आपल्या संशोधकांबरोबरच आपल्या देशाचे पंतप्रधान मा. श्री . नरेंद्र मोदी यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे , हे नाकारता येणार नाही .

आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्थेसाठी इसरो ही महत्वाची संस्था ठरलेली आहे हे वेगळे सांगायला लागू नये. त्यामुळे भविष्यात इसरो आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्था संयुक्त मोहिमा, डेटा शेअरिंग आणि ज्ञानाची देवाणघेवाण अधिक प्रमाणात होऊ शकते, ज्यामुळे भारताला जागतिक अंतराळ संशोधन प्रयत्नांमध्ये योगदान आणि फायदा मिळू शकेल.

अंतराळ मोहीमा आणि त्याद्वारे व्यावसायीकरण

इतर देशांचे १०४ उपग्रह अवकाशात सोडण्याचा यशस्वी विक्रम करून देशाची मान इसरोने उंचावली आहेच त्यामुळे अशा नवनवीन योजनांमुळे भारताच्या अंतराळ अर्थव्यवस्थेमध्ये फार मोठी वाढ होईल , हे नक्की. इसरोच्या आराखड्यात उपग्रह प्रक्षेपण सेवा, उपग्रह संप्रेषण, पृथ्वी निरीक्षण आणि अंतराळ पर्यटन ( Space Tourism ) या व्यवसायातील संधी या असणार आहेत किंबहुवा असायला हव्यात.

Read More : – घटस्थापना 2023

वैज्ञानिकांची वाढ

चांद्रयान-3 चे यश तरुणांना विज्ञान आणि या विषयामध्ये करिअर करण्यासाठी प्रेरित करू शकते. दृढनिश्चय, नवकल्पना आणि कठोर परिश्रम याद्वारे काय साध्य केले जाऊ शकते याची चांद्रयान-3 ही पोच पावती आहे.

शिवाय आदर आणि मान सन्माना बरोबरच आपल्याकडे असणार्‍या कौशल्यामुळे याच भूमीत अशा अनेक मोहिमांची धुरा आपण सांभाळू शकतो ही बाहेरील देशात स्थायिक होणार्‍या संशोधकांना उत्तम संधि आहे , हे पटेलच.

चांद्रयान-3 प्रकल्पाच्या यशामुळे देशाच्या उज्वल भविष्याच्या किती किल्ल्या लपलेल्या आहेत याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. नवनवीन तंत्रज्ञान, शोध आणि अशाच यशस्वी मोहीमामुळे भारताची आंतरराष्ट्रीय छबी तर उजळणार आहेच पण आपल्याच देशातील लोकांचा आपल्या देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हि बदलणार आहे.

चांद्रयान-३ म्हणजे काय?

हे भारताच्या चांद्रयान कार्यक्रमातील तिसरे मिशन आहे, जे चंद्राचा शोध घेण्यासाठी मोहिमांची मालिका आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर आणि रोव्हर सॉफ्ट-लँड करणे हे या मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.

चांद्रयान-३ कधी प्रक्षेपित करण्यात आले?

चांद्रयान-3 चे प्रक्षेपण 14 जुलै 2023 रोजी भारतातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले.

चांद्रयान-३ चंद्रावर कधी उतरले?

23 ऑगस्ट 2023 रोजी 06:30 UTC वाजता चांद्रयान-3 चंद्रावर उतरले. लँडिंग साइट दक्षिण ध्रुव एटकेन बेसिनमध्ये स्थित होती, चंद्राच्या दक्षिण गोलार्धातील एक मोठा प्रभाव विवर.

चांद्रयान-३ यशस्वी आहे का?

चांद्रयान-3 या मोहिमेमध्ये लँडर आणि रोव्हर हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरवल्यामुळे एक नवीन विक्रम इस्रो च्या नावावर जमा झाला आहे. चंद्राचा अधिक चांगल्या पद्धतीनेअभ्यास करणे , हे या मोहिमेमध्ये मिळालेल्या वैज्ञानिक डेटानुसार सहज शक्य होणार आहे.

2 thoughts on “CHANDRAYAN”

Leave a Comment