10 Unknown Secrets Of India : That Will Shock You

10 Unknown Secrets Of India : ऋषी आणि अवतारांची भूमी असलेला ‘भारत’ हा एक रहस्यमय देश आहे. भारतात अशी अनेक रहस्यमयी ठिकाणे आहेत ज्यांचे गूढ अजूनही कायम आहे. या अज्ञात आणि न उलगडलेल्या रहस्यांपैकी, येथे फक्त 10 रहस्ये सांगितली आहेत, कदाचित तुम्ही इथे कधी आला असाल.

10 Unknown Secrets Of India -रहस्यमय मंदिरे

श्रीपद्मनाभम मंदिर, वृंदावन निधीवनचा रंगमहाल, कन्याकुमारी मंदिर, करणी माता मंदिर, शनी शिंगणापूर, सोमनाथ मंदिर, कामाख्या मंदिर, महाकाल मंदिर, काळभैरव उज्जैन मंदिर, अजिंठा-एलोरा,खजुराहो मंदिर, ज्वालादेवी मंदिर,
लेपाक्षी मंदिर आणि जगन्नाथ मंदिर. अशी अनेक मंदिरे आहेत जी वेगवेगळ्या गूढ गोष्टींसाठी ओळखली जातात आणि आजही त्यांचे रहस्य उकललेले नाही. अशी 10 Unknown Secrets Of India बद्दल जाणून घेणे आपल्याला आवडेल.

10 Unknown Secrets Of India
10 Unknown Secrets Of India Image : Google

कैलास पर्वत आणि मानसरोवर

10 Unknown Secrets Of India – हे भारतातील सर्वात गूढ आणि विचित्र ठिकाण आहे. हे अनैसर्गिक शक्तींचे केंद्र मानले जाते. हे पृथ्वीचे केंद्र समजले जातेआणि त्यास अॅक्सिस मुंडी म्हणूनसुद्धा शास्त्रज्ञ संबोधतात.
म्हणतात. अक्ष मुंडी म्हणजे जगाची नाभी किंवा खगोलीय ध्रुव आणि भौगोलिक ध्रुव यांचे केंद्र. हा आकाश आणि पृथ्वी यांच्यातील संबंधाचा बिंदू आहे,जिथे दहा दिशा भेटतात. या ठिकाणाशी निगडीत असंख्य रहस्ये आहेत.

द्वारकेचा नाश कसा झाला

द्वारका, गुजरातच्या किनाऱ्यावर भगवान कृष्णाने स्थापन केलेले शहर. या ठिकाणाला इतर रहस्यांबरोबर एक वेगळे धार्मिकआणि भावनिक महत्त्व आहे. भगवान कृष्णाच्या अवतार समाप्ती नंतर हे शहर समुद्रात बुडाले. आजही त्या शहराचे अवशेष येथे आहेत. हे शहर कसे पाण्यात बुडाले याचे आजही सर्वांना कुतूहल आहे , लाखो भाविक अजूनही तिथे दर्शनासाठी जमतात.

Read More : – 10 Unknown Secrets Of India That Will Shock You

रहस्यमय लेणी

भारतातील अनेक प्राचीन लेण्यांमध्ये आजही, बाग लेणी, अजिंठा-एलोरा लेणी, एलिफंटा लेणी आणि भीम बेटका लेणी यांचा समावेश प्रामुख्याने होतो. या सर्व गुहा कोणी आणि केव्हा बांधल्या? त्याचे गूढ अद्याप उकललेले नाही.

अखंड भारताबद्दल बोलायचे झाले तर अफगाणिस्तानातील बामियानच्या लेण्यांचाही 10 Unknown Secrets Of India मध्ये समावेश होऊ शकतो. भीमबेटकामधील हजारो लेण्यांमध्ये जवळपास 500 लेण्यांमध्ये रॉक पेंटिंग आढळून येतात. काही इतिहासकार येथील सर्वात जुनी चित्रे मानतात. ती, किती हजार वर्षे जुनी आहेत त्याबद्दल बर्‍याच इतिहासकारांमध्ये संभ्रम आहे मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात पाषाणकालीन भीमबेटका लेणी भोपाळपासून ४६ किलोमीटर अंतरावर आहेत. ते विंध्य पर्वत रांगांनी वेढलेले आहे.

मध्य भारतातील पसरलेल्या पठाराच्या दक्षिणेकडील विंध्याचल पर्वतरांगांच्या खालच्या भागात भीमबेटका वसलेले आहे. पूर्व-पाषाण युगापासून ते मध्य पाषाण युगापर्यंत, हे स्थान मानवी संस्कृतीचे केंद्र राहिलेआहे.

सोन्याचा साठा

10 Unknown Secrets Of India :- श्रीपद्मनाभम मंदिराव्यतिरिक्त, बिहारच्या राजगीरमध्ये मौर्य शासक बिंबिसारचा मौल्यवान सोन्याचा साठा दडलेला असल्याचे सांगितले जाते. म्हणूनच बिहार राज्यातील नालंदा जिल्ह्यात असलेले राजगीर हे छोटेसे शहर अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण समजले जाते.

हे शहर प्राचीन काळी मगधची राजधानी होती. या राजगीरमध्ये सोन भंडार गुहा आहे. या गुहेबद्दल अशी धारणा आहे की यात लपलेला अनमोल खजिना जो आजपर्यंत कोणीही शोधू शकलेला नाही . हा खजिना मौर्य शासक बिंबिसार किंवा त्याच्या पूर्वी होऊन गेलेला मगध सम्राट जरासंधाचा असण्याची शक्यता आहे , असा समज आहे. याशिवाय जयगड किल्ल्यातील शाही खजिन्याच्या कथाही प्रसिद्ध आहेत.

विचित्र भारतीय मानव

असे अनेक लोक आहेत जे हजारो वर्षे जगल्याचा दावा केला जातो जसे की अश्वत्थामा, हनुमानजी, जामवंत, विभीषण, परशुराम, महर्षी व्यास, कृपाचार्य, राजा बळी इ. भारतामध्ये असा दावा केला जातो की देवहारी बाबा 750 वर्षे जगले आणि 1990 मध्ये त्यांचे निधन झाले. ‘गणपती सरस्वती’ या नावाने ओळखले जाणारे त्रैलंग स्वामी हे 286 वर्षांचे होते. १६०१ साली जन्मलेले त्रैलंगा स्वामी यांच्या वडिलांचे नाव नृसिंह राव आणि आईचे नाव विद्यावती असे होते. 1737 ते 1887 पर्यंत त्यांचे वास्तव्य वाराणसीमध्ये होते.


तसेच, ज्यांचा जन्म 27 सप्टेंबर 1826 रोजी झाला आणि जानेवारी 1963 मध्ये त्यांनी देह सोडला असे शिवपुरी बाबा सुद्धा होऊन गेले. 31 ऑगस्ट 1730 साली संत लोकनाथजी यांचा जन्म आणि मृत्यू 3 जून 1890 रोजी बंगाल येथे झाला तसेच महावतार बाबा गेली ५००० वर्षे जिवंत असल्याचे सांगितले जाते . फार काळ जिवंत राहण्याचा प्रश्नच नाही, अनेक चमत्कारी, कर्तृत्ववान, जादूगार आणि विचित्र पराक्रम करणारी माणसे येथे झाली आहेत.

सिंधू संस्कृती

भारतातील अनेक संस्कृतींपैकी सिंधू खोरे आणि नर्मदा खोऱ्यातील संस्कृतींचे रहस्य अजूनही एक गूढ आहे. इथली लिपि अजून कोणी वाचू शकले नाही. नवीन संशोधनानुसार, ही सभ्यता 8 हजार बीसी पासून अस्तित्वात होती, परंतु असा अंदाज आहे की 1500 बीसी मध्ये येथे मोठी उलथापालथ झाली असावी

एलियन्सची ठिकाणे

भारतात एलियन्स ची ठिकाणे शोधण्यासाठी खूप प्रयत्न आजपर्यंत झाला आहे. छत्तीसगडमधील बस्तर आदिवासी भागातील चारमा गावाजवळील प्राचीन लेण्यांच्या दगडांवर कोरलेली चित्रे सांगतात की येथे आकाशातून कोणीतरी उतरले होते. लेणी शोधणारे पुरातत्वशास्त्रज्ञ जे. आर.भगत असे सांगतात की चित्रांमध्ये चेहरे वेगळे दिसतात आणि काही चित्रे उडत्या तबकड्यांचीही आहेत. हिमालय, ओरिसा, नर्मदा घाटी, छत्तीसगड, अजिंठा एलोरा महाबलीपुरम, द्वारका, कैलास पर्वत इत्यादी ठिकाणी परग्रहवासीयांचे पुरावे सापडले आहेत.

तलाव

मानसरोवरअसो किंवा महाराष्ट्रातील बुलढाणा येथील लोणार सरोवर, आपल्या देशात अशी माहीत नसलेली अनेक सरोवरे किंवा तलाव आहेत ज्यामध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत. तसेच रूपकुंड सरोवर किंवा नदी हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये आहे.
या किनाऱ्यावर मानवी सांगाडे सापडले आहेत. गेल्या काही वर्षांत भारतीय आणि युरोपीय शास्त्रज्ञांच्या विविध गटांनी हे गूढ उकलण्याचे अनेक प्रयत्न केले, पण ते अयशस्वी ठरले. भारताच्या उत्तरेकडील प्रदेशात उत्खननादरम्यान नॅशनल जिओग्राफिक
(भारतीय विभाग) यांना येथे 22 फूट मोठा मानवी सांगाडा सापडला आहे. उत्तरेकडील वाळवंटातील हा भाग, ज्याला शून्य विवर म्हणून ओळखले जाते, तो लष्कराच्या ताब्यात आहे. जिथून प्राचीन काळी सरस्वती नदी वाहायची.असे मानले जाते की असे महाकाय मानव पृथ्वीवर 5 लाख वर्षांपूर्वी ते 12 दशलक्ष वर्षांपूर्वी राहत होते, ज्यांचे वजन सुमारे 550 किलो होते.

Read More : Social Media Misuse – नैतिकता आणि गोपनीयतेला धोका

अलेया घोस्ट लाइट

पश्चिम बंगालच्या पाणथळ भागात गूढ दिवे दिसत असल्याच्या अनेक बातम्या आल्या. तेथील रहिवासी असणार्‍या लोकांच्या मान्यतेनुसार , मासेमारी करताना मृत्यू पावलेल्या मच्छिमारांचे आत्मा या दिव्यांच्या रूपात दिसत आहेत.
याला लोक भूत दिवे असेही म्हणतात. हा प्रकाश पाहणारे जास्त काळ जगू शकत नाहीत किंवा कुठेतरी भरकटले जातात असेही म्हटले जाते. या पाणथळ भागात अनेक मच्छिमारांचे मृतदेहही सापडले आहेत, परंतु हे भुतांमुळे घडले, हे स्थानिक प्रशासन मान्य करायला तयार नाही. मात्र, हे गूढ गूढ अद्यापही उकललेले नाही. शास्त्रज्ञांना अशी शंका वाटते की पाणथळ भागात अनेकदा मिथेन वायू तयार होतो आणि काही घटकांच्या संपर्कात आल्याने प्रकाश निर्माण होतो.

Leave a Comment