घटस्थापना 2023

शारदीय नवरात्र विशेष

Table of Contents

घटस्थापना 2023 :घटस्थापना मुहूर्त

घटस्थापना 2023 – घटस्थापना मुहूर्त या वर्षी 15 ऑक्टोबर 2023 या दिवशी म्हणजेच घटस्थापना 2023 च्या सकाळी 11.44 – दुपारी 12.30 पर्यन्त आहे, या दिवशी , श्री. देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येईल. शैलपुत्री मातेची पूजा पहिल्या दिवशी केली जाते.

आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यावर, पितृ पंधरवड्यानंतर, अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. शारदीय नवरात्र म्हणून सुद्धा या नवरात्रीला ओळखले जाते.

भाविकांच्या हृदयात नवरात्रोत्सव या सणाचे विशेष स्थान असल्यामुळेच प्रतीवर्षी मोठ्या उत्साहाने भारतभर साजरा केला जातो.

घटस्थापना 2023
घटस्थापना 2023 image : Google

नवरात्रीची ४ प्रमुख अंगे आहेत

१) देवता स्थापन २) मालाबंधन ३) अखंड नंदादीप ४) कुमारीका पूजन..

Read More :-घटस्थापना 2023

का व कशा पद्धतीने केली जाते ?

महाशक्ती श्री दुर्गादेवीने महिषासुर, चंड-मुंड आणि शुंभ-निशुंभ या महाभयंकर दैत्यांचा वध करून सर्व देव आणि मानव यांना अभय दिले. नारद मुनींनी श्रीरामांना रावणाशी युद्धं करण्या अगोदर नवरात्र व्रत करण्यास संगितले होते .

अष्टमीच्या मध्यरात्री देवीने श्रीरामांना दर्शन देवून तुझ्या हातून रावणाचा वध होईल असा आशीर्वाद दिला. श्रीरामांनी व्रत पूर्ण करून दशमीच्या दिवशी लंकेवर सवारी करण्यासाठी प्रस्थान ठेवले व रावणाचा नाश केला

घटस्थापना 2023 : घटस्थापना करण्यासाठी एका परडीमध्ये भरलेल्या काळी मातीमध्ये पाच किंवा नऊ प्रकारचे धान्य टाकून व त्यावर रोज थोडे थोडे पाणी शिंपडले जाते व नंतर त्याची रोपे तयार झालेली दिसून येतात.


तत्पूर्वी , परडीमध्ये माती पसरल्यानंतर , मध्ये एक तांब्याचा तांब्या ठेवला जातो. या तांब्यामध्ये पाच विड्याची पाने किंवा आंब्याचा ढाळ गोलाकार ठेवून त्यावर नारळ ठेवतात. घटाची पूजा केली जाते.

प्रत्येक दिवशी या घटाची पूजा करून त्यावर दर दिवशी नवीन फुलांची माळ चढवली जाते. देवीच्या या घटाजवळ दहा दिवसांसाठी अखंड तेवत राहणारा सुंदर दिवा लावला जातो, ज्याची विशेष काळजी प्रत्येक घरातील माता भगिनी घेताना दिसून येतात. अश्या प्रकारे घटस्थापना केली जाते.

शेतीच्या दृष्टीनं घटस्थापनेचं महत्व काय?

घटस्थापना करताना प्रथम जमीन स्वच्छ करून त्यावर शेतातील काळी माती ठेवली जाते. या मातीत विविध प्रकारचे बियाणे म्हणजेच सातू – हे सृष्टी निर्माण झाल्यानंतरचे पहिले धान्य आहे ते मिसळले जाते त्याबरोबरच खपला,ज्वारी,बाजरी,मटकी, हरभरा, चवळी, करडई,जवस अशी सप्त किंवा नऊ धान्य मिसळी जातात त्यावर ठेवलेल्या एका मातीच्या घटामध्ये रोज नऊ दिवस पाणी घातले जाते.

नवव्या दिवशी घटाचे विसर्जन केले जाते. रब्बी पिकांचा हंगाम सुरु होण्याआधी म्हणजेच पावसाळ्याच्या शेवटी घटस्थापना केली जाते. त्याद्वारे, बियाणे, माती, पाणी आणि हवामानाची चिकित्सा करणारी पारंपारिक पण शास्त्रीय कृषी संबंधित दृष्टीकोण बाळगणारी पद्धती आहे.

घटस्थापना 2023

Image Source : Google

घटस्थापनेचा मंत्र

|| सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ।।

आचमन

हातात पाणी घेऊन फक्त दोनदा आचमन करतात म्हणजे भगवान श्रीविष्णूच्या चोवीस नावांपैकी पहिली तीन नावे उच्चारताना प्रत्येक नावानंतर पळीने पाणी उजव्या हातामध्ये घेऊन आचमन करतात नंतर चौथे नाव उच्चारून पळीने उजव्या हातात पाणी घेवून ते ताम्हणात सोडले जाते, असे एकूण दोन वेळा केल्यानंतर , हात जोडून चौथ्या नावापासून पुढील नावे भक्तिभावाने म्हणतात.


ॐ केशवाय नम: । ॐ नारायणाय नम: । ॐ माधवाय नम: । ॐ गोविंदाय नम: । ॐ विष्णवे नम: । ॐ मधुसूदनाय नम: । ॐ त्रिविस्र्माय नम: । ॐ वामनाय नम: । ॐ श्रीधराय नम: । ॐ हृषीकेशाय नम: ।ॐ पद्मनाभाय नम: । ॐ दामोदराय नम: ।
ॐ संकर्षणाय नम:। ॐ वासुदेवाय नम: । ॐ प्रद्युम्नाय नम: । ॐ अनिरुध्दाय नम: । ॐ पुरुषोत्तमाय नम: । ॐ अधोक्षजाय नम: । ॐ नारसिंहाय नम: । ॐ अच्युताय नम: ।ॐ जनार्दनाय नम: । ॐ उपेन्द्राय नम: । ॐ हरये नम: ।ॐ श्रीकृष्णाय नम: ।

प्राणायाम

प्राणायाम करताना म्हणावे –
ॐ प्रणवस्य परब्रम्ह ऋषि। परमात्मा देवता । दैवी गायत्री छंद: । गायत्र्या गाथिनो विश्वामित्र ऋषि : । सविता देवता । गायत्री छंद: । प्राणायामे विनियोग: । ॐ भू: ॐ भुव: ॐ स्व: ॐ मह: ॐ जन: ॐ तप: ॐ सत्यम्‌ ॥ॐ भूर्भुव: स्व: ।
ॐ तत्सवितुर्वरेण्यम्‌ । भर्गो देवस्य धीमहि । धियो यो न: प्रचोदयात्‌ ।

ॐ आपोज्योती रसोऽमृतं ब्रह्मभूर्भुव: स्वरोम ‍ देवादिकांना वंदन – श्रीमन्महागणाधिपतये नम: । श्री सरस्वत्यै नम: । श्री गुरुभ्यो नम:। वेदाय नम: । वेदपुरुषाय नम: ।इष्टदेवताभ्यो नम: । कुलदेवताभ्यो नम: । स्थानदेवताभ्यो नम: । ग्रामदेवताभ्यो नम:।वास्तुदेवताभ्यो नम: । शचीपुरंदराभ्यां नम: । उमामहेश्वराभ्यां नम: । श्री लक्ष्मी नारायणाभ्यां नम: ॥ कालकामपरशुरामेभ्यो नम: । मातृपितृभ्यां नम: ।
आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नम: । सर्वेभ्यो देवेभ्यो नम:। सर्वेभ्यो ब्राम्हणेभ्यो नम: । उपस्थितसर्वलोकेभ्यो नम: । एतत्कर्मप्रधानदेवताभ्योअ नम: ॥ अविघ्नमस्तु ॥

प्रार्थना

आरंभलेली पूजा निर्धोकपणे पार पडावी म्हणून इष्ठदेवतांचे नामस्मरण करून हात जोडून प्रार्थना करतात
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।१॥
या कुंदेन्दुतुषारहार धवला या शुभवस्त्रावृता । या वीणावरदण्डमंडितकरा या श्वेतपद्मासना
या ब्रह्मच्युतशंकर प्रभृतिभिदैवै: सदा वंदिता । सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेष जाड्यापहा ॥२॥
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: । गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्रीगुरुवे नम: ॥३॥
सर्वत सर्वकार्येषु नास्ति तेषाम मंगलम्‍ । येषां हृदिस्थो भगवान मंगलायतनं हरि: ॥४॥
तदेव लग्न सुदिनं तदेव । ताराबलं तदेव विद्याबलं दैवबं तदेव । लक्ष्मीपते तेङघ्रियुगं स्मरामि ॥५॥
सर्वेष्वारब्धकाकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वरा: । देवा दिशन्तु न: सिद्धि: ब्रह्मोशानजनार्दना: ॥६॥

देशकालादींचे उच्चारण

ॐ श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मण: द्वितीये परार्धे विष्णुपदे, श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे , भरतवर्षे भरतखंडे, जंबुद्वीपे इषुपाद्रामक्षेत्रे गोदावर्या: ( दक्षिणे ) तीरे, कलियुगे । कलिप्रथमचरणे। अष्टविंशत्याम्‌ युगे ।
बौद्बावतारे । शालिवाहन शके शोभन नाम संवत्सरे । दक्षिणायने । शरदऋतौ । आश्विनमासे शुक्लपक्षे… तिथौ … प्रतिपदा , भानु वासरे अद्य … चित्रा दिवस नक्षत्रे बव योगे बाल करणे …..कन्या स्थिते वर्तमाने चन्द्रे ।कन्या स्थिते श्रीसूर्ये ।
मेष स्थिते देवगुरौ ग्रहेषु यथ:यथंराशिस्थितेषु सत्सु एवंगुणविशेषविशिष्टायां शुभपुण्यतिथौ ।आता आपले गोत्र आणि जन्मनाव उच्चार करावा

संकल्प

मम आत्मन: श्रुतिस्मृतिपुराणोक्त फलप्राप्त्यर्थ, अस्माकं सर्वेषां सहकुटुंबानां क्षेम- स्थैर्य-विजय – अभय – आयुरारोग्य- ऐश्वर्याभिववृद्ध्यर्थ द्विपद-चतुष्पादानां शांत्यर्थ पुष्ट्यर्थ तुष्ट्यर्थ । समस्त मंगलावाप्त्यर्थ।समस्त दुरितोपशांत्यर्थ । समस्ताभ्युदयार्थ च इष्टकामसंसिद्ध्यर्थ ।कल्पोतफलावात्प्यर्थ । … मम सहकुटुंबस्य त्रिगुणात्मका श्रीदुर्गाप्रीतिद्वारा सर्वापच्छांतिपूर्वक दीर्घायुधर्नन – पुत्रदिवृध्दि – शत्रुपराजय -किर्तिलाभ- प्रमुख – चतुर्विध- पुरुषार्थ – सिध्दयर्थ – अद्यारंभ्य नवमीपर्यंत महाकाली – महालक्ष्मी – महासरस्वती नवदुर्गा प्रीत्यर्थ मालाबंधनं अखंड दीपप्रज्वालनपूर्वकं कुलाचार असेल त्याप्रमाणे उच्चारतात.

चंडिकास्तोत्र

तन्मंत्र जप- ब्राम्हणकुमारी पुजन-उपवास-नक्तैभुक्तान्यतम-नियमादिरूपं शारदानवरात्रपूजां करिष्ये । तदंगत्वेन प्रतिपदा विहितं कलश स्थापनादि करिष्ये ।
( असे म्हणल्यानंतर उजव्या हातातल्या पळीने पाणी घेऊन ताम्हनात सोडावे ) तथाच आसनादि कलश-शंख – घंटापूजनं – दीपपूजनं करिष्ये । शरीरशुद्धयर्थ (श्रीपुरुषसूक्तेन ) षडंगन्यास च करिष्ये । आदौ निर्विघ्नतासिध्दयर्थ श्रीमहागणपतिपूजनं करिष्ये । ( असे म्हणून ताम्हनात उजव्या हाताने पळीभर पाणी सोडावे )

श्रीमहागणपति पूजन

तांदुळ किंवा गहू यांच्या छोट्याशा राशीवर श्रीगणपतीचे प्रतीक म्हणून नारळ किंवा सुपारी ठेवून किंवा छोटीशी मूर्ती ठेवून त्यावर गंध,अक्षता, फु्ले वाहून पूजा करावी.
सकलपूजार्थे गंधाक्षतापुष्पं समर्पयामि’। नमस्कार करून नंतर श्रीमन्महागणपतये नमो नम: । श्रीमहागणपतयै नम: आवाहनं समर्पयामि ॥ असे म्हणतात.

श्री गणपतीवर अक्षता वाहून नंतर श्रीना आसन – अर्ध्य उपचार अर्पण करतात.
नंतर विड्याच्या पानांवर सुपारी ठेवून दक्षिणा अर्पण करावी. श्री गणपतीची पूजा पूर्ण झाल्यावर पुढील प्रमाणे प्रार्थना करावी – ‘कार्य मे सिध्दिमायातु प्रसन्ने त्वयि धातारि । विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनाय । ‘ आणि ‘ श्रीमहागणपतये नमो नम: ।’
असे म्हणून हात जोडावेत.

आसन व वातावरण यांची शुद्धी _ ॐ पृथ्वी त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुनां धृता । त्वं च धारण मां देवि पवित्र कुरु चासनं ॥१॥
अपक्रामन्तु भूतानि पिशाचा: सर्वतो दिशम्‍ सर्वषाम विरोधेन पूजाकर्म समारभे ॥२॥
अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमिसंस्थिता: । ये भूता विघ्नकर्तारस्तेनश्यन्तु शिवाज्ञया ॥३॥
असे म्हणून हातामध्ये अक्षता घेऊन आपल्याभोवतीच्या चारी दिशांना हळू फेकाव्यात .

षडंगन्यास – ॐ यत्पुरुषं व्यदधु: कातिधाव्यकल्पयन्‍ मुखं किमस्य कौ बाहू का उरु पादा उच्येते । हृदयाय नम:।
असे म्हणून हृदयाला हात लावतात.
ॐ ब्राह्मणोऽस्य मुखमासीत बाहू राजन्य: कृत: उरु तदस्य यद‍ वैश्य: पद्‍भ्यां शूद्रो अजायत । शिरसे स्वाहा।
असे म्हणून मस्तकाला स्पर्श करतात.
ॐ चंद्रमा मनसो जातश्चक्षो सूर्यो अजायत । मुखदिंदुश्चाग्निश्च प्राणाद्‍वायुरजायत । शिखायै वषट्‍।
असे म्हणून शेंडीला स्पर्श करतात.

ॐ नाभ्या आसीदन्तरिक्षं शीष्णौद्यौ: समवर्तत पदभ्यां भूमिर्दिश: श्रोत्रात्तथा लोकाँ अकल्पयन्‌ । कवचाय हुं ।
असे म्हणून हृदयाच्या खालच्या बाजूला दोन्ही हातांनी स्पर्श करावा .

ॐ सप्तास्यासन्‌ परिधयस्त्रिसप्त समिध: कृता:। देवा यज्ञज्ञं तन्वाना अबघ्नन्‌
पुरुषं पशुं । नेत्रत्रयाय वौषट्‍ । डोळ्यांना स्पर्श करावा ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवस्तानि धर्माणि प्रथमान्यासन । तेह नाकं महिमान: सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा: अस्त्राय फट् असे म्हणून टाळी वाजवावी व ‘इति दिग्बंध:’ असे म्हणावे.

कलश पूजा

कलशस्य मुखे विष्णु: कंठे रुद्र: समाश्रित: मूले तु स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा: स्मृता: ॥
कुक्षौ तु सागरा: सर्वे सप्तद्वीपा वसुधरा । ऋग्वेदोऽथ यजुर्वेद: सामवेदो ह्यथर्वण:। अंगैश्च सहिता: सर्वे कलशं तु समाश्रिताः ।
अत्र गायत्री सावित्री शांतिः पुष्टिकरी तथा । आयांतु देविपूजार्थ दुरितक्षयकारकाः ॥

गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वती । नर्मदे, सिंधु, कावेरि जलेऽस्मिन्‌ सन्निधिं कुरु ॥ श्रीवरुणाय नमः । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि ॥


गंध, अक्षता व फुले शुद्ध पाण्याने भरलेल्या कलशाला वाहावी. शंख पुजा – शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता । पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगासरस्वती ॥ त्वं पुरा सागरोत्पन्नौ विष्णुना विधृतः करे । अग्रतः सर्वदेवानां पांचजन्य नमोऽस्तुते ॥
शंखदेवयायै नमः । सर्वोपचारार्थे गंध-पुष्प-तुलसीपत्रं समर्पयामि ॥ गंध, फुले, तुलसी शंखाला अर्पण करावी. घंटा पूजा – आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां । कुरु घंटाएवं तत्र देवताऽव्हानलक्षणम्‌ ॥ घंटायै नमः ।सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥

घंटेला गंध, अक्षता, फुले वाहावी व घंटा वाजवावी. दीपपूजा – भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यः । अतस्त्वां स्थापयाम्यत्र मम शांतिप्रदो भवो ॥ दीपदेवतायै नमः ।सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥ असे म्हणून समईला गंध, अक्षता, फूल वाहून नमस्कार करतात.

मंडप पूजा

घटस्थापना करावयाच्या जागे वर लहानशा मंडपावर आंब्याचे डहाळे पसरवून नीट सुशोभित करतात. या मंडपीला देवतास्वरूपी मानून तिची पूजा करतात. श्री मंडपदेवतायै नमः । गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥
(मंडपाला गंध, अक्षता, फुले वाहतात.)

प्रोक्षण

अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा । यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यंतरः शुचिः ॥

असे केल्यावर पूजाविधी संपूर्ण होतो.

उत्सवाचा प्रत्येक दिवस देवी पार्वतीच्या अवताराला समर्पित आहे. या नऊ दिवसांच्या उत्सवात शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या अवतारांची पूजा केली जाते.

Read More : – Seed Fund Scheme भन्नाट आणि धडाकेबाज योजनांसाठी सरकार देणार RS. 50 लाख

मालाबंधन : घटस्थापना 2023: नवरात्र घटमाळा।

१ ली माळ – विडयाची पाने
२ री माळ – बेल, धोतरा, रुई
३ री माळ – दुर्वा, झेंडु
४ थी माळ – मोगरा, जाई-जुई
५ वी माळ – तुळशी
६ वी माळ – गुलाब, कमळ
७ वी माळ – शेवंती, कृष्णकमळ
८ वी माळ – लाल जास्वंद
९ वी माळ – लिंबू

नवरात्रीचे महत्व

जीवनामध्ये शक्ति ऐश्वर्य समृद्धी व ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून दुर्गासप्तशती आणी सौंदर्य-लहरी ग्रंथांचे पठन करून देवीची उपासना करतात . तसेच श्रीसुक्तांची आवर्तने, कुंकूमार्चन सेवा, तांबूल प्रदान सेवा, सरस्वती-पूजन सेवा, महालक्ष्मी-पूजन यासारख्या सेवा करतात .

या काळात देवीची पूजा करण्यासाठी भाविक उपवास करतात. या सणाला खूप आध्यात्मिक महत्त्व आहे. स्त्रिया आपल्या कुटुंबासाठी आणि पतीसाठी प्रार्थना करण्यासाठी उपवास ठेवतात. काही लोक निर्जला व्रत पाळतात, तर काही लोक
सणात शाकाहारी आहाराचे पालन करतात.

देवीच्या पूजेत वापरल्या जाणार्‍या साहित्यामागे सुद्धा काही विशिष्टअर्थ आहे . जसे घटस्थापनेत विड्याची पाने पृथ्वीतत्वाचे प्रतीक आहे , तर हळकुंड तेज तत्वाचे प्रतीक आह, . सुपारी आप तत्वाचे प्रतीक आहे, तर खारीक वायु तत्वाचे प्रतीक आहे
, दक्षिणा ( ज्याला पाण्याचा स्पर्श झाला आहे असे नाणे ) आकाश तत्वाचे प्रतीक आहे .म्हणजेच पंचमहाभूतांची ही सर्व प्रतीके आहेत त्याबरोबर हळद ही परमकल्याण रूप आहे. कुंकू मांगल्याचेरूप आहेसिंदूर जीवनात अभ्युदयाचा काल दाखवतो .
तुपाचा दिवा स्नेहाचे प्रतीक आहे. तेलाचा दिवा स्थैर्य दर्शवितो. दान / दक्षिणा समर्पण वृत्तीचे प्रतीक आहे. कापूर आरती केल्याने घराची शुद्धता होते.

माँ दुर्गेचे नऊ अवतार आणि नवदुर्गेचे महत्त्व

घटस्थापना 2023 : नवरात्रीचे नऊ दिवस महत्त्वाचे असले तरी अष्टमी आणि नवमीचे विशेष महत्त्व आहे.

पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी तमोगुणी महाकालीची पूजा करतात.

माँ शैलपुत्री

तिच्या आत्मदहनानंतर, देवी पार्वतीने भगवान हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला. या रूपात ती माँ शैलपुत्री होती. संस्कृतमध्ये शैल म्हणजे पर्वत. त्यामुळे शैलपुत्री म्हणजे पर्वताची कन्या. शैलपुत्री देवीची पूजा ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाते.

माँ ब्रह्मचारिणी

माँ पार्वतीने दक्ष प्रजापतीच्या घरी तिच्या कुशाम्नाद रूपानंतर जन्म घेतला. देवी पार्वती या अवतारातील एक महान सती होती आणि तिचे अविवाहित रूप देवी ब्रह्मचारिणी म्हणून पूजले जात असे . देवी सर्व भाग्याचा प्रदाता मंगल मंगल राज्य करते.
तिने भगवान शिवाला तिचा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी मोठी तपश्चर्या केली. तिच्या तपश्चर्येदरम्यान, तिने 1,000 वर्षे फुले आणि फळे आणि आणखी 100 वर्षे पालेभाज्यांवर व जमिनीवर झोपुन घालवली.

माँ चंद्रघंटा

देवी चंद्रघंटा हा माँ पार्वतीचा विवाहित अवतार आहे. भगवान शिवाशी विवाह केल्यानंतर , देवीने तिच्या कपाळाला अर्धा किंवा अर्धचंद्राने सजवले आणि माँ चंद्रघंटा म्हणून ओळखले गेले. ती शुक्राचे राज्य करते आणि नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी
तिची पूजा केली जाते.

दुसरे तीन दिवस सत्त्वगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची पूजा करतात.

माँ कुष्मांडा

देवी पार्वतीने सिद्धिदात्रीचे रूप धारण केल्यानंतर सूर्याच्या मध्यभागी राहण्यास सुरुवात केली जेणेकरून सूर्य विश्वाला ऊर्जा सोडू शकेल. माँ कुष्मांडामध्ये सूर्याच्या आत राहण्याची शक्ती आणि क्षमता आहे आणि तिच्या शरीराची चमक आणि तेज सूर्यासारखे तेजस्वी आहे. देवीला आठ हात असून ती अष्टभुजा देवी म्हणून ओळखली जाते.

माँ स्कंदमाता

जेव्हा देवी पार्वती भगवान स्कंद/भगवान कार्तिकेयची आई बनली तेव्हा तिला माँ स्कंदमाता म्हणून ओळखले जात असे. देवी पार्वतीच्या या रूपाची पूजा करणार्‍या भक्तांना भगवान कार्तिकेयचा आशीर्वादही मिळतो. देवी स्कंदमाता भयंकर सिंहावर आरूढ होते आणि बाळ मुरुगनला तिच्या मांडीवर घेते. ती कमळाच्या फुलावरही बसते आणि देवी पद्मासन म्हणून ओळखली जाते.

माँ कात्यायनी

महिषासुराचा नाश करण्यासाठी देवी पार्वतीने देवी कात्यायनीचे रूप घेतले. हे देवी पार्वतीचे सर्वात हिंसक रूप होते, ज्याला योद्धा देवी म्हणूनही ओळखले जाते. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी माँ कात्यायनीची पूजा केली जाते. पंचांगानुसार,
देवी पार्वतीचा जन्म कात्या ऋषींच्या घरी झाला आणि म्हणूनच देवी पार्वतीचे हे रूप कात्यायनी म्हणून ओळखले जाते.

शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात

माँ कालरात्री

जेव्हा देवी पार्वतीने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिची सोन्याची त्वचा काढून टाकली तेव्हा तिला देवी कालरात्री म्हणून ओळखले गेले. तिला देवी पार्वतीचे उग्र रूप म्हणून ओळखले जाते. माँ कालरात्रीचा रंग गडद असून ती
गाढवावर स्वार होते. तिला चार हातांनी चित्रित केले आहे – तिचे उजवे हात अभय आणि वरदा मुद्रामध्ये आहेत आणि तिच्या डाव्या हातात तलवार आणि प्राणघातक लोखंडी हुक आहे.

माँ महागौरी

वयाच्या सोळाव्या वर्षी, देवी शैलपुत्री अत्यंत सुंदर आणि गोरा वर्ण असलेली होती. त्यामुळे तिला देवी महागौरी म्हणून ओळखले जाऊ लागले. ती राहू या ग्रहावर राज्य करते. तिच्या गोऱ्या त्वचेमुळे महागौरीची तुलना शंख, चंद्र आणि कुंडाच्या
पांढर्‍या फुलाशी केली जाते. ती फक्त पांढरी वस्त्रे परिधान करते म्हणून तिला श्वेतांबरधारा असेही म्हणतात.

शारदीय नवरात्रीतील महाष्टमी 22 ऑक्टोबर 2023 रोजी आहे. देवी महागौरीची पूजा नवरात्रीच्या आठव्या दिवशी केली जाते. अश्विन शुक्ल अष्टमी तिथी 21 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 09.53 ते 22 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 07.58 पर्यंत असेल.

माँ सिद्धिदात्री

हिंदू धर्मग्रंथांनुसार, भगवान रुद्राने निराकार आदि-पराशक्ती – शक्तीची सर्वोच्च देवी – सृष्टीच्या प्रारंभी प्रार्थना केली. ती भगवान शिवाच्या डाव्या अर्ध्या भागातून माँ सिद्धिदात्रीच्या रूपात प्रकट झाली, त्यानंतर भगवान शिवाला अर्ध-नारीश्वर
हे नाव मिळाले. ती देवी आहे जी तिच्या भक्तांना सर्व प्रकारच्या सिद्धी धारण करते आणि प्रदान करते.

शारदीय नवरात्रीची महानवमी 23 ऑक्टोबर 2023 रोजी आहे. हा दिवस माता सिद्धिदात्रीला समर्पित आहे. अश्विन शुक्ल नवमी तिथी 22 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 07.58 ते 23 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 05.44 पर्यंत असेल.
नवमी तिथी हा शारदीय नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे. नवरात्रीचे 9 दिवस पूजा व उपवास याची सांगता या दिवशी हवन-यज्ञ करून केली जाते.

घटस्थापना 2023 : कुमारीका पूजन..

नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी , रोज एका कुमारीकेस , वाढत्या वयाच्या क्रमाने बोलावून , तिचे पाद्यपूजा, दुग्धपान, फलाहार, अल्पोपहार देऊन नवरात्रीच्या शेवटचे दिवशी, जेवण – वस्त्र- अलंकार-उपयोगी वस्तू देऊन व पुजन करून आशीर्वाद घ्यावेत. स्कंद पुराणात वयानुसार कुमारिका पूजन त्याचे फळ सांगितले आहे देवी व्रतांमध्ये कुमारिका पूजन परमावश्यक आहे /असते. अष्टमीच्या दिवशी तसेच नवमीच्या दिवशी किंवा या दोन्ही दिवशी सुद्धा कन्यापूजा करता येते.

१ वर्षाची कुमारीका. – मोक्ष व भोग प्राप्ती.
२ वर्षाची कुमारी. – ऐश्वर्य प्राप्ती
३ वर्षाची त्रिमूर्तीनी – धर्म, अर्थ, काम,मोक्ष
४ वर्षाची कल्याणी – राज्यपद प्राप्ती
५ वर्षाची रोहिणी – विद्या प्राप्ती
६ वर्षाची काली – षट्कर्म सिध्दी
७ वर्षाची चंडीका – राज्य प्राप्ती
८ वर्षाची शांभवी – संपत्ती प्राप्ती
९ वर्षाची दुर्गा – पृथ्वी वरील राज्य
१० वर्षाची सुभद्रा – मने इच्छा प्राप्ती.

घटस्थापना 2023 : रोजचा नैवैद्य

प्रत्येक वारी कोणता नैवैद्य दाखवावा ते देवी भागवतात सांगितले आहे, ते असे
१ रविवारी ..पायस (खिर)
२ सोमवारी .. शुध्द तुप
३ मंगळवारी ..केळी
४ बुधवारी .. लोणी
५ गुरूवारी .. खडीसाखर
६ शुक्रवारी ..साखर
७ शनिवारी ..साजूक तुप

घटस्थापना 2023 : नऊ संख्या आणि नवरात्र अध्यात्मिक संबंध आणि महत्त्व

नवरात्रीच्या घटाभोवतीच्या मातीत पसरलेली ‘नऊ’ धान्यं : साळ, गहू, ज्वारी, बाजरी,, जवस, मटकी, मका, मूग, हरभरा

दुर्गामातेचे ‘नऊ’ अवतार : शैलपुत्री, ब्रह्यचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिरात्री.

‘नऊ’ नावं दुर्गादेवीची : अंबा, चामुंडा, महाकाली, जगदंबा, नारायणी, रेणुका, अष्टमुखी, भुवनेश्वरी, ललिता

महाराष्ट्रातली देवीमातेची प्रसिद्ध ‘नऊ’ देवस्थानं : वज्रेश्वरी (वसई), महालक्ष्मी (डहाणू), महाकाली (अडिवरे), सप्तशृंगी (वणी), रेणुकादेवी (माहूर), महालक्ष्मी (कोल्हापूर), तुळजाभवानी (तुळजापूर), योगिनीमाता (अंबेजोगाई),
श्री एकवीरादेवी (कार्ला).

नवरात्रींचे ‘नऊ’ रंग : लाल, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, भगवा किंवा केशरी, पांढरा, गुलाबी, जांभळा.

नवग्रहांच्या ‘नऊ’ समिधा : रुई, पलाश, खदिर, अपामार्ग, पिंपळ, औदुंबर, शमी, दुर्वा, कुश.

नवग्रहांची ‘नऊ’ रत्नं : माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलमणी, गोमेद, वैडूर्य,पीतवर्ण-मणी.

‘नऊ’ प्रकारची महत्वाची दानं : अन्नदान, रक्तदान, धनदान, ज्ञानदान, भूदान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अवयवदान, देहदान.

नवविध भक्तीचे ‘नऊ’ प्रकार : श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन, पादसेवन, वंदन, सख्य, दास्य, आत्मनिवेदन.

प्रसिद्ध ‘नऊ’ नाग : शेष, वासुकी, तक्षक, शंखपाल, कालिया, कर्कोटक, पद्मक, अनंत, पद्मनाभ.

समस्त मानवजातीला सामावून घेणा-या पृथ्वीचे नवखंड : भरतखंड (पूर्व), केतुमालखंड (पश्चिम), रम्यखंड (दक्षिण), विधिमालखंड (उत्तर), वृत्तखंड (आग्नेय), द्रव्यमालखंड (नैऋत्य), हरिखंड (वायव्य), हर्णखंड (ईशान्य), सुवर्णखंड (मध्य).

मानवी देहांतर्गत वसलेले ‘नऊ’ कोश : अन्नमय, शब्दमय, प्राणमय , ज्ञानमय , आकाशमय, विज्ञानमय, आनंदमय, मनोमय, प्रकाशमय

‘नऊ’ गुणधर्म मानवी मनाचे : सद्विचार, रागद्वेषादी असद्विचार , धैर्य, सामर्थ्य, भ्रांती, कल्पना, वैराग्यवादी, क्षमा, स्मरण, चांचल्य.

‘नऊ’ अवस्था मानवी शरीराच्या : मातेच्या उदरातली निषेक रूपावस्था, गर्भावस्था, जन्म, बाल्य, कौमार्य, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व

घटस्थापना 2023 : काय काळजी घ्याल

घटस्थापना 2023 च्या आधी या 5 गोष्टी घरातून काढून टाका, व्रत-उपासनेचे फळ मिळेल, शास्त्रात काय म्हटंलय?

शारदीय नवरात्री – घटस्थापना 2023 – सुरू होण्यापूर्वी घरात ठेवलेले जुने जोडे आणि चप्पल काढून टाका.असे मानले जाते की, यामुळे नकारात्मक उर्जेचे प्रसारण वाढते. अस्वच्छता किंवा दुर्गंधी असेल तिथे देवी दुर्गा कधीच वास करणार नाही.

देवीच्या आगमनापूर्वी, घर पूर्णपणे स्वच्छ करा आणि धूळ काढून टाका.

घरात ठेवलेले तामसिक अन्न बाहेर काढावे.

तसेच रात्रीच्या वेळी खरकटी भांडी ठेवू नका. असे केल्याने देवीचा कोप होतो

घरात चुकूनही दारू ठेवू नका. यामुळे 9 दिवस केलेले उपवास आणि उपासना व्यर्थ जातात.

घटस्थापना 2023 : देवीचे स्वागत करण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुंकू लावून स्वस्तिक बनवावे

घटस्थापना 2023 – च्या पहिल्या दिवशी घर रांगोळीने सजवावे. असे म्हणतात की, याने दुर्गा माता खूप आनंदित होते आणि कुटुंबाला आशीर्वाद देते नवरात्रीमध्ये देवीचे आवाहन करण्यापूर्वी घरभर गंगाजल शिंपडावे आणि 9 दिवस फक्त सात्विक अन्न शिजवावे.

नवरात्रीच्या उपवासाचे नियम आणि परंपरा

पुष्कळ लोक उत्सवादरम्यान मनोभावे देवीची पूजा करतात परंतु उपवास करत नाहीत किंवा त्यांच्या आरोग्याच्या स्थितीमुळे उपवास करणे शक्य होत नाही. तुम्ही व्रत करत नसलात तरी खालील काही गोष्टींचे बंधन पाळणे आवश्यक आहे .

कांदा आणि लसूण वगळा
या आणि इतर काही भाज्या नवरात्रीच्या घटस्थापना 2023 काळात टाळावेत. उत्सवादरम्यान, सात्विक अहाराचे सेवन करणे उचित आहे ,जे तुम्हाला भक्तीने भरून टाकते.

दाढी करू नका किंवा नखे ​​कापू नका
नवरात्रीमध्ये नखे कापणे आणि मुंडण करणे अशुभ समजले जाते.

ज्या देवतेचे ‘नवरात्र ‘ असते त्या देवतेची पूजा करताना देवाचा / देवीचा टाक न हलवता, रोज फुले बदलून किंवा फुलांनी किंचित पाणी शिंपडून पुजा करावी बाकी रोजच्याप्रमाणेच इतर देवांची रोजच्या सारखी ताम्हणात पूजा करावी. मात्र काही ठिकाणी इतर देवांची पूजा करणे किंवा देव न हलवणे असे नवरात्रीमध्ये करतात ते शास्त्रसंमत नाही

आजारी असलात किंवा वयोमानापरत्वे झेपणार नसेल तर उठता- बसता म्हणजे नवरात्र बसवितांना चा १ला दिवस व शेवटचा दिवस असे २ व नवमीचा १ असे ३ दिवस किंवा फक्त अष्टमीचा उपवास केला तरी चालतो.

नवरात्रात “अखंड नंदादीप” लावला जातो त्यावर काजळी आल्यावर तो विझतो अगर वाऱ्याने, हवेने विझतो /मालवतो ते अशुभ नाही कुठलीही शंका न घेता दिव्याची वात स्वच्छ करून काजळी काढून वा बदलून तो परत लावावा किंवा त्यात एक दोन कापराच्या वड्यांची पावडर करून टाकली तर वात, मंद व शांत जळत, स्वच्छ प्रकाश ही मिळेल.

देवीस फुले,तुलसीपत्र, दुर्वा, इत्यादीं बाहेरून आणलेल्या वस्तू अर्पण करताना स्वच्छ करून वाहाव्यात

शक्यतो नैवैद्यास घरात तयार केलेलेच पदार्थच ठेवावेत. जर श्रध्देने- आत्मसमर्पणाने आनंदाने उत्सव साजरा केला तर त्याचे निश्चितच चांगले फळ मिळते.

अष्टमीचे पूजनासाठी रात्रौ १२|| ते १|| ही वेळ घ्यावी कारण त्या आधी कधी कधी सप्तमी असू शकते.

दसरा (विजया दशमी ) हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असला तरी त्या दिवशी विवाह- वास्तू निक्षेप/शांती इ.शुभ कामे अश्विन महिन्या मध्ये त्याज्य समजली जातात. मात्र वाहन खरेदी,घर खरेदी,कलशपूजन इ.करू
शकता.

घटस्थापना 2023 – दिवशी सप्त धान्य हळदीच्या पाण्यात बुडवून नंतर काळ्या मातीत पेरावेत. नवरात्रीमध्ये रोज सुवासिक फुलांची माळ घटास बाधांवी.

घटस्थापना 2023 : शारदीय नवरात्रीचे रोजचे रंग

नवरात्रात रोज कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावेत यासाठी कोणताही आधार किंवा ठोस पुरावा धर्मशास्त्रात नाही

दुकानदार , मिडीयावाले मात्र जाहिरातींचा मारा करून आज कोणता रंग परिधान करायचा हे सांगत असतात तरीही सर्व स्रीयांच्या भावनांचा मान व आदर म्हणून रोजच्या रंगाची यादी देत आहोत.

रविवार … केशरी ,अबोली
सोमवार .. पांढरा
मंगळवार.. लाल, डाळिंबी
बुधवार … निळा, आकाशी
गुरूवार .. पिवळा
शुक्रवार … हिरवा,पिस्ता, शेवाळी
शनीवार…..जांभळा ,करडा (ग्रे )
रविवार …..केशरी ,अबोली
सोमवार… .मोरपंखी
मंगळवारी …गुलाबी

घटस्थापना 2023 : देशभरात शारदीय नवरात्र

देशभरात नवरात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. गुजरातमधील गरबा आणि दांडियाची रंगीबेरंगी आणि विलोभनीय स्थळे, पश्चिम बंगालमधील माँ दुर्गेसाठी भव्य पंडाल किंवा दक्षिण भारतातील गोलूमध्ये बाहुल्या आणि आकृत्यांचे उत्सवपूर्ण प्रदर्शन .

नवरात्र हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे . उत्तर भारतात, नवरात्रीचा उपवास खूप लोकप्रिय आहे , भक्त त्यांच्या परंपरेनुसार नऊ दिवसांचा उपवास किंवा पहिला आणि शेवटचा उपवास करतात. नवमीच्या दिवशी कंजक म्हणून कन्याना पूजले जाते आणि नवरात्रीचे पारण केले जाते व लहान मुलींना हलवा पुरी मेजवानी दिली जाते .

शारदीय नवरात्री घटस्थापना 2023 – पश्चिम बंगाल, बिहार, आसाम, त्रिपुरा, ओडिशा, झारखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये दुर्गा पूजा म्हणून साजरी केली जाते

घटस्थापना 2023 : हे माहिती असावे

नवरात्र बसविल्यावर समजा घरात सुतक/ अशौच /वृध्दी आली तर सप्तशती पाठ थांबवून सुतक संपल्यानंतर राहिलेले पाठ पुर्ण करावेत मात्र नवरात्र उपवास चालू ठेवावेत व माळ/दिवा इत्यादी शेजारच्यांकडून अथवा ब्राम्हणाकडून,
लांबचे नातेवाईकांकडून करावे आणि घरातील साहित्य वापरू नये.

घटस्थापना 2023 च्या आधीच असा प्रसंग आला तर मात्र १३ वा /१५वा झाल्यावर उरलेल्या दिवशी नवरात्र बसवता येईल जसे …७|५|३ व १ दिवसाचे बसवता येईल त्या नवरात्राला……सप्तरात्रौत्सव ( ७ दिवसांचे)..पंचरात्रौत्सव ( ५ दिवसांचे) त्रिरात्रौत्सव
( ३ दिवसांचे) एक रात्रौत्सव (१ दिवसाचे) अशा पध्दतीने करता येईल तसे दिवस मोजून कसे बसवता येईल ते बघावे

हे ही वाचा :Seed Fund Scheme भन्नाट आणि धडाकेबाज योजनांसाठी सरकार देणार RS. 50 लाख

1 thought on “घटस्थापना 2023”

Leave a Comment